शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'वंचित' मोर्चा काढण्यावर ठाम, पोलिसांनी परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:59 IST

Nagpur : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी संघ मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी संघ मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. संविधान चौकात सभा घेऊन जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस मात्र संघ कार्यालयावर मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पोलिस दक्ष असून, आंदोलनकर्तेही तयारीत असल्याचे सांगतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भाजपची मातृसंघटना आहे. आरएसएसच्या निर्देशानुसारच भाजप कार्य करीत असल्याची टीका अनेकदा झाली आहे. यापूर्वी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आता एपस्टीन फाईल्सवर संघाने स्पष्ट उत्तर द्यावे, या मागणीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी (दि.२३ मार्च) संघ मुख्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सकाळी अकरा वाजता संविधान चौकापासून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु, पोलिसांनी मात्र या मोर्चाला आरएसएसच्या मुख्यालयापर्यंत काढण्यास परवानगी नाकारली आहे.

संविधानिक मार्गाने संविधान चौकातच सभा घेण्याबाबत अर्ज केल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा वंचितच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीदेखील मोर्चा निघाला होता. त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा निघेलच, असा कार्यकर्त्यांचा दावा असून, पोलिसांनीही तगड़ा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने या मोर्चाची संपूर्ण तयारी केली आहे. रविवारी मोर्चाच्या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविभवन येथे पार पडली. या बैठकीमध्ये वंचितचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर, राज्य महासचिव राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत, अॅड. सुजाता वालदेकर आणि पूर्व विदर्भ संयोजक अरविंद सांदेकर उपस्थित होते. दरम्यान, वंचितचे इतरही ज्येष्ठ नेते नागपुरात दाखल झाले आहेत.

भाजप कार्यकर्ते व हिंदू संघटनांचा विरोध

पोलिसांचे म्हणणे आहे की, आरएसएस मुख्यालय हे अतिसंवेदनशील स्थळाच्या यादीत आहे. त्यांना दहशतवादी संघटनांकडून धोका आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणे धोक्याचे ठरेल. मोर्चामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या मोर्चाला राजकीय व धार्मिक संघटना, भाजप कार्यकर्ते व हिंदू संघटनांचा विरोध आहे. यापूर्वी शहरात धार्मिक दंगल झाली आहे, त्यामुळे पुन्हा दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

"आमच्या मोर्चाला हिंदू संघटनांचा विरोध आहे म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली असेल तर पोलिसांच्या विरोधात कोर्टात जाऊ."- अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते

"वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचा संयुक्त मोर्चा हा आरएसएसच्या विरोधात नाही तर त्यांच्या कार्यालयावर आहे. इतिहासात पहिल्यांदाच आरएसएससोबत संवाद साधण्यासाठी हा मोर्चा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाइलमध्ये आले आहे. या फाइलमध्ये नाव आल्यामुळे ते अमेरिकेला कॉम्प्रमाईज झाल्याचे दिसून येते. आरएसएस ही संस्था नैतिकता व देशभक्तीवर बोलत असते. नरेंद्र मोदी यांना आरएसएसने पंतप्रधानपदावर बसवले आहे. एपस्टीन फाइलमध्ये पंतप्रधान मोर्दीचे नाव आले हे आरएसएसला पटतंय का? आरएसएसच्या नैतिकतेला पटतंय का?"- सुजात आंबेडकर, वंचितचे नेते

English
हिंदी सारांश
Web Title : Vanchit adamant on march, police deny permission to protest.

Web Summary : Police denied permission for Vanchit Bahujan Aghadi and Congress's RSS HQ march. They demand answers on Epstein files. Despite the ban and BJP opposition, Vanchit plans to proceed, citing a need for dialogue with RSS.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीnagpurनागपूर