वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षासोबत जाणार; निवडणुकीबद्दल दिशानिर्देश

By आनंद डेकाटे | Updated: September 7, 2025 20:20 IST2025-09-07T20:19:47+5:302025-09-07T20:20:26+5:30

पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे

Vanchit Bahujan Aghadi will go with like-minded parties; Directions regarding upcoming elections | वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षासोबत जाणार; निवडणुकीबद्दल दिशानिर्देश

वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षासोबत जाणार; निवडणुकीबद्दल दिशानिर्देश

- आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या निवडणुकीत काही समविचारी पक्षासोबत मिळून निवडणूका लढविण्याचा मानस वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे यांनी रविवारी पत्रपरिषदेत बोलून दाखविला. युती झाली तर ठिक अन्यथा पक्ष स्वबळावर लढेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तीन दिवसांपूवींच भोंडे यांची पक्षाच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून पक्षाध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नियुक्ती केली. त्यानंतर रविवारी पक्षाच्या पुर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील अध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष व सर्व शहराध्यक्षांची एक बैठक रविभवनात पार पडली. या बैठकीत संघटना बांधणी व निवडणूकीत पक्षाला यश कसे मिळवून देता येईल, याबद्दल दिशानिदेंश देण्यात आले. महापालिका, जिल्हापरीषद, पंचायत समिती, नगर परीषद निवडणूकीबद्दल पक्षाची तयारी व पक्ष वाढविण्यावर चर्चा करण्यात आली. निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना पराभूत करणे, यावरही मंथन करण्यात आले. सर्व जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पक्षात मोठ्या संख्येत पक्षाचे व तर पक्षांचे कार्यकतें उमेदवारी मागत असल्याचे पक्षाकडे येत असलेल्या अर्जावरून दिसत असल्याचे भोंडे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत केंद्रीय कार्यकारीणी सदस्य ॲड. सुजाता वालदेकर, राज्य समिती सदस्य कुशल मेश्राम, अरविंद सांदेकर, राजू लोखंडे, मुरली मेश्राम, राहूल वानखेडे, प्रशांत नगरकर, बाळू टेंभूणें, के. एन.नान्हे, किशोर खैरकर, डॉ. अविनाश नान्हे, हितेश मडावी, प्रमोद नेवारे, डॉ. आम्रपाली वानखेडे आदी उपस्थित होते.

Web Title: Vanchit Bahujan Aghadi will go with like-minded parties; Directions regarding upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.