नव्या वर्षात ‘विहिंप’चा ‘रामजप’
By Admin | Updated: December 24, 2016 02:33 IST2016-12-24T02:33:48+5:302016-12-24T02:33:48+5:30
देशातील राजकारणाची दिशा बदलणाऱ्या राममंदिराचा मुद्दा गेल्या काही काळापासून मागे पडला आहे. मात्र गेल्या

नव्या वर्षात ‘विहिंप’चा ‘रामजप’
राममंदिर निर्मितीसाठी होणार आक्रमक : संघभूमीत होणार रणनीतीवर मंथन
योगेश पांडे ल्ल नागपूर
देशातील राजकारणाची दिशा बदलणाऱ्या राममंदिराचा मुद्दा गेल्या काही काळापासून मागे पडला आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून अयोध्येतील राममंदिराबाबत आग्रही असणाऱ्या विश्व हिंदू परिषदेतर्फे या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्यात येण्याची चिन्हे आहेत. येत्या वर्षात देशभरात वातावरणनिर्मिती करण्यासाठी विहिंपतर्फे पावले उचलण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील आठवड्यात संघभूमीत यासंदर्भातील रणनीतीवर मंथन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर यावरून राजकारण तापू शकते.
केंद्रात सत्ताबदलानंतर अयोध्येतील राममंदिराबाबत सकारात्मक वातावरणनिर्मिती होईल, अशी संघ परिवाराला अपेक्षा होती. मात्र याबाबत अद्यापही ठोस पावले न उचलण्यात आल्याची भावना परिवारात निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात घेता नव्या वर्षात विश्व हिंदू परिषदेतर्फे राममंदिराचा मुद्दा परत समोर आणण्याची तयारी आहे.
२६ डिसेंबरपासून नागपुरात ‘विहिंप’च्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया, राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रेड्डी यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी सहभागी होणार आहेत.