जिल्हाधिकारी कार्यालयात ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:39+5:302021-09-25T04:07:39+5:30

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या पुढाकाराने शुक्रवारी आयोजित लसीकरण मोहिमेत ...

Vaccination of 70 officers and employees in the Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयात ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Next

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या पुढाकाराने शुक्रवारी आयोजित लसीकरण मोहिमेत ७० शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करण्यात आले.

बचत भवनात पार पडलेल्या या लसीकरण शिबिरात ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये ३२ पुरुष व ३८ महिलांनी लाभ घेतला आहे. यामध्ये पहिला डोस ४५ व्यक्तींनी तर दुसरा २५ व्यक्तींनी घेतला असून १८ ते ४५ वयोगटातील -५०, ४५ ते ६० वयोगटातील- १९ तर ६० नंतरच्या एका व्यक्तीने लसीकरण करुन घेतले.

जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान झाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेत ६१ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण करण्यात आले.

Web Title: Vaccination of 70 officers and employees in the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.