कूलरचा वापर करताना घ्या खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:46+5:302021-05-01T04:06:46+5:30

उन्हाळयात शॉक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कूलरचा वापर नेहमी थ्री-पिन प्लगवरच करावा. घरात ...

Use caution when using coolers | कूलरचा वापर करताना घ्या खबरदारी

कूलरचा वापर करताना घ्या खबरदारी

Next

उन्हाळयात शॉक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कूलरचा वापर नेहमी थ्री-पिन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून, विजेचा धोका निर्माण होताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

कूलरच्या लोखंडी बाह्य भागात वीज पुरवठा येऊ नये, यासाठी कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. पाणी भरताना कूलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा. कूलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर पंप सुरू करू नये. पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअर लॉक होऊन अशा वेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे, या पद्धतीने खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

Web Title: Use caution when using coolers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.