शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कोड घालविण्यासाठी केसांच्या मेलानोसाईटचा वापर : सुशील सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:09 AM

दोन वर्षे योग्य औषधोपचार व त्यानंतरच्या शस्त्रक्रियेने पांढरे डाग किंवा कोड १०० टक्के घालविता येतात. यात त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. यात आता केसांच्या मुळांमधील ‘मेलानोसाईट’चाही वापर केला जातो, अशी माहिती, मुंबईचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुशील सावंत यांनी येथे दिली. महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.

ठळक मुद्दे त्वचा रोग तज्ज्ञाच्या ‘क्युटीकॉन-२०१८’ ला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षे योग्य औषधोपचार व त्यानंतरच्या शस्त्रक्रियेने पांढरे डाग किंवा कोड १०० टक्के घालविता येतात. यात त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. यात आता केसांच्या मुळांमधील ‘मेलानोसाईट’चाही वापर केला जातो, अशी माहिती, मुंबईचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुशील सावंत यांनी येथे दिली.महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.डॉ. सावंत म्हणाले, पांढरे कोड निर्माण होण्याची कारणे निश्चित सांगता येत नाहीत. जनुकदोष, प्रतिबंधक उपाय यंत्रणेमध्ये दोष, न्यूरोजनिक दोष ही महत्त्वाची कारणे असू शकतात. मानसिक तणाव यामुळेसुद्धा ‘मेलॅनिन’ची निर्मिती थांबते आणि पांढरे डाग दिसू लागतात. कोडवर उपचार आहेत. सुरुवातीला दोन वर्षे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात औषधोपचार घेऊन डाग येणे आणि पसरणे थांबविले जाते. त्यानंतर ज्या शरीराच्या भागावर पांढरा डाग आहे त्यावर संबंधित शस्त्रक्रिया करून डाग घालविले जातात. यात साधारण मांडीचे, हाताच्या दंडाचे, कंबरेवरचे साधारण ‘०.१’ ते ‘२.५’ एमएम त्वचा काढून लावली जाते. अलीकडे केसाच्या मुळांमधून ‘मेलानोसाईट’ काढून त्याचे ‘सस्पेशन’ तयार करून जिथे कोड आहे तिथे पेशी ‘ट्रान्सफर’ करणाऱ्या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले आहे. या सर्व शस्त्रक्रियेचा यशाचा दर १०० टक्के आहे. परंतु शस्त्रक्रियेपूर्वी ‘पोस्ट थेरपी’ करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.‘पेम्फिगस’ ससंर्गजन्य नाहीनायर हॉस्पिटलच्या त्वचारोग विभागाच्या प्रमुख डॉ. चित्रा नायक म्हणाल्या, त्वचा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. बाह्य वातावरण विरुद्ध अडथळा निर्माण करते आणि शरीराची संरक्षणाची पहिली ओळ म्हणून कार्य करते. यामुळे त्वचेच्या आजाराबाबत गंभीर असणे आवश्यक आहे. विशेषत: त्वचेवर येणारे पाण्याने भरलेले लाल रंगाचे फोड म्हणजे ‘पेम्फिगस’ हा संसर्गजन्य आजार नाही. परंतु रुग्णांच्या शरीरावरील हे फोड पाहून अनेक जण रुग्णापासून दूर जातात. हा रोग तोंडापासून ते गुप्तांगासारखी त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यावर होतो. हा रोग वेदनादायी आहे. पूर्वी या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण मोठे होते. परंतु आता औषधोपचार उपलब्ध आहे. या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने ‘अँटीबॉडी’ तयार करते. जी आपली त्वचा आणि श्लेष्मल पडद्यामधील निरोगी पेशींवर हल्ला करते.

परिषदेला ९००वर त्वचारोग तज्ज्ञांचा सहभाग

 या परिषदेला देशभरातून ९००वर त्वचारोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी डॉ. स्वप्निल शाह, डॉ. शैलेंद्र निसळ, डॉ. सतीश सावंत, डॉ. प्रियाल गाला, डॉ. सुजय खांदपूर, डॉ. ए. रज्जाक अहमद, डॉ. उदय कोपकर आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेच्या आयोजनासाठी ‘क्युटीकॉन’ परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. विक्रांत सावजी, आयोजक सचिव डॉ. रिझवान हक, डॉ. सुधीर मामीडवार, डॉ. मनोज वाघमारे, डॉ. मोहन शेंदरे, डॉ. प्राची मते, डॉ. जयंत लांजेवार, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. जयेश मुखी आदी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर