उर्मिला पवार यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार; आंबेडकराईट मुव्हमेंटचे साहित्य पुरस्कार जाहीर

By आनंद डेकाटे | Updated: February 9, 2026 18:43 IST2026-02-09T18:43:04+5:302026-02-09T18:43:28+5:30

आंबेडकराईट मुव्हमेंटचे साहित्य पुरस्कार जाहीर : लोकनाथ यशवंत, प्रा. डॉ.अनिल गजभिये, विलास अंभोरे, अर्जुन व्हटकर, मुसाफिर बैठा यांचा समावेश

Urmila Pawar to receive this year's Dr. Babasaheb Ambedkar Lifetime Achievement Award; Ambedkarite Movement's Literary Award announced | उर्मिला पवार यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार; आंबेडकराईट मुव्हमेंटचे साहित्य पुरस्कार जाहीर

Urmila Pawar to receive this year's Dr. Babasaheb Ambedkar Lifetime Achievement Award; Ambedkarite Movement's Literary Award announced

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲण्ड लिटरेचर या संस्थेच्या वतीने यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव " पुरस्कार ज्येष्ठ लेखिका ' आयदानकार ' उर्मिला पवार (मुंबई) यांना जाहीर झाला आहे.

उर्मिला पवार या प्रखर सामाजिक जाणिवेतून लेखन करणाऱ्या चिंतनशील लेखिका आहेत. त्यांचे आयदान हे आत्मकथन प्रचंड गाजले असून ते इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवादित झाले आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यापीठात ' आयदान ' अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. सहावं बेट, चौथी भिंत,हातचा एक या त्यांच्या कथासंग्रहांनी समाजमन ढवळून निघाले. निळे आकाश सोबतीला, कोकणातील दलितांचे रितीरिवाज आणि लोकगीते, डॉ. आंबेडकर जीवन कालपट, दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य, आम्हीही इतिहास घडवला या पुस्तकांनी एकूणच मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.

संस्थेने इतर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचीही घोषणा देखील केली. त्यात वसंत मून वैचारिक - संशोधन पुरस्कार प्रा. डॉ.अनिल गजभिये (इंदूर)यांच्या ' दलित साहित्य विचार - विमर्श ' या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. बाबुराव बागूल कथा -कादंबरी पुरस्कार विलास अंभोरे ( वाशीम) यांच्या ' युद्धलिपी ' या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. दया पवार आत्मकथन पुरस्कार अर्जुन व्हटकर ( सोलापूर) यांच्या 'चलबट ' या आत्मकथनास तर नामदेव ढसाळ काव्यपुरस्कार लोकनाथ यशवंत (नागपूर) यांच्या '...हे तर होणारच होते ' या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे. भगवान दास हिंदी दलित साहित्य पुरस्कार मुसाफिर बैठा (पाटना) यांना जाहीर झाला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय, आणि सचिव डॉ मच्छिंद्र चोरमारे यांनी कळविले आहे.

७ मार्च रोजी वितरण समारंभ

दहा हजार रुपये रोख,शाल,स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, शाल,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे इतर वाड्.मय पुरस्कारांचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या ७ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता 'मधुरम ' सभागृह, हिंदी मोरभवन, सीताबर्डी येथे पार पडेल.
 

Web Title : उर्मिला पवार को डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित

Web Summary : उर्मिला पवार को डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जीवन गौरव पुरस्कार मिला। अम्बेडकराइट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर ने वसंत मून और बाबूराव बागुल पुरस्कार सहित अन्य राज्य स्तरीय साहित्यिक पुरस्कारों की भी घोषणा की। पुरस्कार समारोह 7 मार्च को होगा।

Web Title : Urmila Pawar Honored with Dr. Babasaheb Ambedkar Lifetime Award

Web Summary : Urmila Pawar receives the Dr. Babasaheb Ambedkar Lifetime Achievement Award. Other state-level literary awards, including Vasant Moon and Baburao Bagul awards, were also announced by the Ambedkarite Movement of Culture and Literature. The award ceremony will be held on March 7th.

टॅग्स :nagpurनागपूर