शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 10:50 IST

४६.२ मिमी पावसाची नोंद; उपराजधानीचा पारा १०.८ अंशांनी घसरला

नागपूर : अवकाळी पावसाने वातावरणात गारठा वाढवला आहे. नागपुरात काश्मीर-शिमल्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.मंगळवारी दिवसभर आकाशात काळ्या ढगांची गर्दी होती. सकाळी ६ पासून सुरू झालेला पाऊस दुपारी १२ पर्यंत सुरू राहिला. गेल्या २४ तासांत नागपुरात ४६.२ पावसाची नोंद झाली. यासोबतच कमाल तापमनात १२ अंशाची घट होऊन पारा १९ अंशापर्यंत घसरला. दिवसाच्या तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. दरम्यान, हवामान खात्याने २९ व ३० नोव्हेंबर रोजी येलो अलर्ट जारी केला असून, या काळात पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवस व रात्रीच्या तापमानात २८ अंश सेल्सिअसचा फरक राहिला. तापमानात दोन अंशाची घट होऊन पारा १६.२ अंशावर पोहोचला. हवामान खात्यानुसार १ डिसेंबरनंतर आकाश स्वच्छ राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते. सद्य:स्थितीत अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सोबतच राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात चक्रीय वादळ तयार झाले आहे. यामुळे नागपूरसह पूर्ण विदर्भातपाऊस पडत आहे. दिवसभर पाऊस व ढगाळ वातावरणामुळे दृश्यता ५०० हून १ हजार मीटरवर जाऊन पोहोचली आहे. सामान्यपणे दृश्यता २ ते ४ किमी असते.

नागपूर थंड, पण दुसऱ्या स्थानी

विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत पाऊस पडला आहे. त्यामुळे तापमानात सरासरी ७ ते १२ अंशांची घट झाली आहे. विदर्भात १८.५ अंश तापमानासह यवतमाळ सर्वांत थंड राहिले. १९ अंशांसह नागपूर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अमरावतीचे तापमान १९.८ तर गोंदियाचे तापमान १९.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

विदर्भात सर्वत्र पाऊस

- विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पाऊस पडला. वर्धा ४६.३ मिमी, अकोला ४२.६, अमरावती ३४.६, बुलढाणा ३२, ब्रह्मपुरी ४, चंद्रपूर ३१.४, गोंदिया २३, वाशिम ३६, यवतमाळ १५.१ मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसVidarbhaविदर्भnagpurनागपूर