अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; झाडे, विद्युत पाेल पडले; अनेक भागात अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 20:35 IST2023-04-20T20:34:53+5:302023-04-20T20:35:48+5:30
Nagpur News गुरुवारी दिवसभर तापल्यानंतर सायंकाळी जाेराच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नागपूर शहरासह जिल्ह्यातही चांगलेच झाेडपले.

अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; झाडे, विद्युत पाेल पडले; अनेक भागात अंधार
नागपूर : गुरुवारी दिवसभर तापल्यानंतर सायंकाळी जाेराच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नागपूर शहरासह जिल्ह्यातही चांगलेच झाेडपले. शहरात अनेक भागात गारपीटही झाली. वादळामुळे शहरातील अनेक भागात माेठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. झाडे काेसळल्याने तारा तुटून विजेचे पाेलही खाली पडल्याने व विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक वस्त्यात अंधार पसरला हाेता.
हवामान विभागाने गुरुवारी गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला हाेता. ढगाळ वातावरणामुळे पारा कमी झाला असला तरी उन्हाचे चटके व उकाड्याने नागरिकांना त्रासवले हाेते. सायंकाळी मात्र अचानक वातावरण बदलले आणि विजांसह मेघगर्जना सुरू झाली. जाेराच्या वादळी वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली. शहरातील काही भागात गारपीटही झाली. मात्र वादळाने चांगलेच नुकसान केले. लक्ष्मीनगर, देवनगर, बजाजनगर, माटे चाैक, दीक्षाभूमी ते नीरी राेडवरील अनेक माेठी झाडे रस्त्यावर काेसळली.