शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत ! रालोआच्या विजयानंतर २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याचा बावनकुळेंचा दावा

By योगेश पांडे | Updated: November 14, 2025 15:13 IST

Nagpur : निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारमध्ये रालोआला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. २०४७ पर्यंत देश व राज्यात रालोआच सत्तेवर राहील असा त्यांनी दावा केला आहे.

६५ वर्षे लोकांनी काँग्रेसला जात-धर्माच्या आधारावर मतदान केले. मात्र भाजपने विकासाचा अजेंडा दिला आणि देश आज विकासाच्या मार्गावर ठामपणे चालला आहे. २०४७ पर्यंत केंद्र आणि राज्यात रालोआच सत्तेत राहील, यात शंका नाही. बिहारच्या निकालामुळे रालोआला आणखी मजबूती मिळाली आहे.  देशभरात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होईल आणि जनता विकासाला प्राधान्य देत पुढील निवडणुकांतही रालोआलाच पाठिंबा देईल असेही बावनकुळे म्हणाले.

बिहारमधील अभूतपूर्व विजय हा देशाच्या राजकीय परिवर्तनाचे प्रतिक आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाच्या ध्येयाला पसंती दिली आहे. बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं इतकं मोठे बहुमत रालोआला मिळालले आहे. जनता विकास, विश्वास आणि विकसित भारताच्या संकल्पनेसोबत उभी राहिली. या विजयाने देशभरातील सामान्य मतदाराचा विकासाकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

काँग्रेस दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे आणि राहुल गांधींचे नेतृत्व हतबल झाले आहे. काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही. समाजात तेढ निर्माण करणे हा त्यांचा एकमेव हेतू दिसतो. २०२९ मध्ये काँग्रेस देशातील सर्वात छोटी पार्टी बनेल, असा चिमटा त्यांनी काढला.

निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते. हीच त्यांची पारंपरिक सवय झाली आहे. विरोधकांकडे कोणताही रोडमॅप नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA's Unprecedented Bihar Victory: Bawankule Predicts Rule Until 2047

Web Summary : Following NDA's Bihar win, Minister Bawankule predicts the alliance will rule India and Maharashtra until 2047. He attributes the victory to a focus on development, contrasting it with Congress's divisive politics. He criticized Rahul Gandhi's leadership and Congress's decline.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाnagpurनागपूर