विकृत व्यक्तीकडून सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 22:09 IST2022-05-31T22:08:33+5:302022-05-31T22:09:01+5:30

Nagpur News सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजबाग परिसराला लागून असलेल्या एका पडक्या घरात एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Unnatural acts by a perverted person with six young children | विकृत व्यक्तीकडून सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

विकृत व्यक्तीकडून सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

ठळक मुद्देआंबा आणि चिंचांचे दाखविले होते आमिष

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजबाग परिसराला लागून असलेल्या एका पडक्या घरात एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एप्रिल ते २७ मे या कालावधीत या सर्व घटना घडल्या. आंबा आणि चिंचा देण्याचे आमिष दाखवून आरोपी मुलांना तेथे घेऊन जात होता.

मयूर मोडक (२८, रा. धरमपेठ) असे आरोपीचे नाव आहे. मयूर हा अमरावती रोडवरील झोपडपट्टीत राहणारा नऊ वर्षांचा मुलगा व त्याच्या मित्रांना महाराज बागेलगतच्या आवारात आंबे व चिंचा तोडण्यासाठी घेऊन जात असे. तेथे त्याने मुलांना पडक्या घरात नेऊन अनैसर्गिक कृत्य करण्यास सुरुवात केली. एप्रिलपासून हा प्रकार सुरू केला. शुक्रवार २७ मे रोजीही मयूरने नऊ वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते. घरी परतल्यावर मुलाला वेदनांनी त्रासलेले पाहून वडिलांनी विचारपूस सुरू केली. यावर मुलाने वस्तुस्थिती सांगितली. आरोपी इतर मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य करीत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या वडिलांनी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३७७ आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Unnatural acts by a perverted person with six young children