शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याच्या दुष्कृत्याची शिक्षा भोगतोय निरपराध कुणाल

By admin | Updated: July 2, 2014 00:50 IST

जन्मदात्याचे चांगले कर्तृत्व मुलांना सुसंस्कारित करते. मात्र त्यांनी आयुष्यात कुठलेही दुष्कर्म केल्यास मुलांनाही त्याची फळे भोगावी लागतात. एका पित्याने असेच दुष्कर्म केले आणि त्याची फळे मात्र

नातेवाईकांनीही नाकारले : आता आधार बालसुधारगृहाचामोहन राऊत - अमरावतीजन्मदात्याचे चांगले कर्तृत्व मुलांना सुसंस्कारित करते. मात्र त्यांनी आयुष्यात कुठलेही दुष्कर्म केल्यास मुलांनाही त्याची फळे भोगावी लागतात. एका पित्याने असेच दुष्कर्म केले आणि त्याची फळे मात्र त्याच्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला भोगावी लागत आहेत. पन्नास हजारांसाठी नागपुरातील चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचा १३ वर्षीय मुलगा कुणालला (काल्पनिक नाव) नातेवाईकांनी नाकारले आहे. निरपराध कुणाल आईवडिलांच्या कृत्याची शिक्षा भोगतो आहे़नागपूरच्या कैलासनगरातील मनोज वैरागडे यांची आठ महिन्यांची चिमुकली ‘परी’ हिचे नागपुरातून गुरुवारी अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ता अतुल व त्याची पत्नी विशाखा काटे हे मुलगा कुणाल व अपहृत परी या मुलीला घेऊन भटकत होते. दरम्यान परीच्या पित्याला फोन करुन काटे दाम्पत्याने पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हे सर्व रविवारी गोंडवाना एक्स्पे्रसने नागपुरकडे जात असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धामणगाव रेल्वे स्थानकावर पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. धामणगाव रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण पुलगाव रेल्वे पोलीस व तेथून नागपूर रेल्वे पोलिसांकडे वळते केले. त्यानंतर अजनी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. अपहृत परीला तिच्या आई-वडिलांच्या सुपुर्द केले. न्यायालयाने आरोपी काटे दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली. परंतु त्यांचा १३ वर्षीय मुलगा कुणालचा प्रश्न उपस्थित झाला. जन्मदात्यांच्या अपराधामुळे कुणालला स्वीकारण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे कुणालची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. सोळा वर्षांपूर्वी अतुल व विशाखाचा आंतरजातीय विवाह झाला. दोन्ही कुटुंबांनी या दोघांना आपल्या घराची पायरी चढू दिली नाही़ भाड्याच्या खोलीत संसार करताना राहताना आयुष्याचा कंटाळा आला पण ज्या मुलाला आपण जन्म दिला त्याचे काय होणार अशी चिंता या दाम्पत्याला सतावत होती. मागील पाच ते सहा वर्षांपासून हे जोडपे मिरज रेल्वे स्थानकावर पोळ्या लाटण्याचे काम करीत होते. इयत्ता आठवीपासून कुणालला नागपुरात शिकवायचे असा त्यांनी ठाम विचार केला. परंतु शहरात आल्यानंतर पाचवीला पुजलेली पैशाची चणचण होतीच. अनेकांची दारे ठोठावली, मित्रांना मदत मागितली परंतु कोणीच मदतीचा हात पुढे केला नाही. त्यामुळे त्यांनी मनोज वैरागडे या मित्राच्या मुलीच्या अपहरणाचा हा मार्ग पत्करला.अपहरण करणाऱ्या या जोडप्या विरूध्द नागपूर पोलिसांनी अपहरण व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला. येथील अतिरिक्त मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश बोलाणी यांनी ४ जुलै पर्यंत या जोडप्याला पोलीस कोठडी सुनावली़ नागपूर पोलिसांनी माणुसकीचा आधार घेत सर्व नातेवाईकांसोबत कुणालला नेण्यासाठी संपर्क साधला. परंतु एकही नातेवाईक निरपराध कुणालला आपल्या घरी न्यायला तयार झाला नाही. त्यामुळे अखेर नागपूर येथील रिमांड होममध्ये त्याची रवानगी करण्यात आली़ तू कोणत्या गुन्ह्यात आलास? असे त्याला येथील मुले विचारतात तेव्हा कुणाल नि:शब्द होतो़ आपल्या जन्मदात्याच्या दुष्कर्मामुळे निष्पाप कुणाल आठव्या वर्गात प्रवेश घेण्याऐवजी रिमांड होममध्ये राहण्याची शिक्षा भोगतो आहे़