शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘डेड’

By admin | Updated: July 23, 2014 01:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाचे ‘डिजिटल’ संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता सातत्याने

प्रशासन झोपेत : ‘एमकेसीएल’च्या जाण्याचा फटकानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाचे ‘डिजिटल’ संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता सातत्याने ‘आऊट आॅफ सर्व्हिस’चा संदेश लिहून येत आहे. ‘एमकेसीएल’ने काढता पाय घेतला असला तरी विद्यापीठाने तत्काळ पर्यायी व्यवस्थेची हालचाल न केल्याने संकेतस्थळ ‘डेड’ झाले आहे.विद्यापीठाची दोन संकेतस्थळे अस्तित्वात आहेत. यातील ‘आरटीएमएनयू. डिजिटलयुनिव्हर्सिटी’ या संकेतस्थळाचे सर्व काम ‘एमकेसीएल’कडे होते. सुरुवातीला सर्वकाही योग्य राहिल्यानंतर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’मध्ये खटके उडायला लागले. ‘एमकेसीएल’ने कामांची पूर्तता केली नसल्याचा आरोप विद्यापीठाकडून करण्यात आला अन् सुमारे ३ कोटी ६४ लाखांची देयके थकवून ठेवली. ‘एमकेसीएल’ने वाढीव बिले दिल्याचादेखील दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. ‘एमकेसीएल’ने थकबाकीसाठी जवळपास २५० वेळा विद्यापीठाला पत्र लिहिले. अखेर ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला. याचा फटका सर्वात पहिले बसला तो विद्यापीठाच्या ‘आरटीएमएनयू.डिजिटलयुनिव्हर्सिटी’ या संकेतस्थळाला. हे संकेतस्थळ तात्पुरते ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्याचा संदेश येत आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी थेट संपर्क साधावा, अशा ओळीदेखील ‘फ्लॅश’ होत आहेत. यासंदर्भात प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)निकालांसाठी पर्यायी व्यवस्थाविद्यापीठाचे संकेतस्थळ ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्यासंदर्भात विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कोणीही यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. सर्वांनीच ‘एमकेसीएल’वर खापर फोडले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.आरटीएमएनयूरिझल्टस्.ओआरजी’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता निकालांना फटका बसणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. एका खासगी कंपनीला याची जबाबदारी देण्यात आली आहे.