शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयात जाणार

By admin | Updated: April 25, 2015 02:20 IST

वित्त व लेखा अधिकारी पदावर पूरण मेश्राम यांच्या फेरनिवडप्रकरणी विद्यापीठातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

ंनागपूर : वित्त व लेखा अधिकारी पदावर पूरण मेश्राम यांच्या फेरनिवडप्रकरणी विद्यापीठातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मेश्राम यांची पुनर्नियुक्ती झाली होती. या निवडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.७ जुलै २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मेश्राम यांची पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या प्रस्तावाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानंतरही तत्कालीन कुलगुरू व विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सदर प्रकरण कुलपतींकडे सादर केले होते. कुलपतींच्या आदेशानंतर विद्यापीठाने वित्त व लेखा अधिकारी पदाकरिता जाहिरात देऊन अर्ज मागवले होते. या जाहिरातीनंतर सहा जणांचे या पदासाठी अर्ज आले होते. दरम्यान, याविरुद्ध मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. व्यवस्थापन परिषदेच्या प्रस्तावानुसार २९ मे २०१९ पर्यंत पदावर कायम ठेवावे, अशी त्यांची विनंती आहे. मेश्राम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांची पुनर्नियुक्ती ३० मे २०१४ पासून ग्राह्य धरण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्यासंदर्भात विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाचे मत मागितले होते. विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात जायला काहीच हरकत नाही असे उत्तर राज्यपालांकडून आले असून, आता त्यादिशेने तयारी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. (प्रतिनिधी)