केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:08 AM2020-01-02T00:08:40+5:302020-01-02T00:09:49+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल.

Union Home Minister Amit Shah today in Nagpur |  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात 

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात 

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल. दरम्यान, एनडीआरएफ अकादमीचे भूमिपूजन केले जाईल. फायर सर्व्हिस क्षेत्रातील गॅलेंट्री अवॉर्डचे वितरणही त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित राहतील.
शाह यांचे दुपारी २.२० वाजता दिल्लीहून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यावेळी नागपूर श्हर भाजपतर्फे त्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर ते थेट राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये पोहचतील. या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री नव्या राष्ट्रीय फायर सर्व्हिस कॉलेजचे कॅम्पस राष्ट्राला समर्पित करतील. त्यांच्या हस्ते एनडीआरएफ अकादमीचे उद्घाटन होईल. प्रेसिडेंट्स फायर सर्व्हिस मेडलचे वितरण केले जाईल. गृहमंत्री हे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या प्रयोगशाळेला भेट देतील. एनडीआरएफ अकादमी व डीआरडीओच्या मॉडेलचे प्रदर्शन येथील यावेळी आयोजित करण्यात आले आहे. शाह हे सायंकाळी ५.५० वाजता विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील.

 

Web Title: Union Home Minister Amit Shah today in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.