शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात; उद्या ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुख्य अतिथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 10:30 IST

लोकमत नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी उद्या शुक्रमवारी सायंकाळी नागपूरमध्ये दाखल होत आहेत. शनिवारी ते नागपूरवरून पुण्याला रवाना होतील आणि तेथून रविवारी कोल्हापूरला जातील. त्यांचे शुक्रवारी रात्री ७.४५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमन होणार आहे. 

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ते मुख्य अतिथी असतील. तत्पूर्वी सकाळी ते दीक्षाभूमी तसेच रेशीमबागेतील हेडगेवार समृतिमंदिराला भेट देतील.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असतील. 

या समारंभात ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘सुवर्णमुद्रा’ विशेषांकाचे, तसेच ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील ‘बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण होईल. ‘लोकमत’ने तयार केलेले नागपूर गीत (ॲन्थम) गृहमंत्री अमित शाह हे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करतील. 

दरम्यान, अमित शाह यांचा नागपूर दौरा लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. विमानतळापासून ते त्यांचे मुक्कामस्थळ तसेच कार्यक्रमस्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात राहणार आहे. याशिवाय वाहतुकीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी दिवसभर यासंदर्भात बैठका चालल्या व सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज येणार

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शुक्रवारीच नागपुरात येणार आहेत. मुख्यमंत्री हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील व तेथेच गृहमंत्र्यांचे ते स्वागत करण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्रीदेखील सकाळी नागपुरात पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहBJPभाजपाnagpurनागपूर