शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नागपुरात  बेरोजगार तरुणांनी केली पदव्यांची होळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 7:58 PM

राज्यभरात होळीचा सण साजरा होत आहे. होळीदहन म्हणजे वाईट विचार, प्रथा, परंपरा आगीत जाळून राख करावी आणि दुसऱ्या  दिवशी रंगोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. पण आजच्या (गुरुवारी) होळीच्या दिवशी विदर्भातील काही बेरोजगार तरुणांनी एकत्र येत आपल्या पदव्यांचीच होळी केली.

ठळक मुद्देडिग्री जलाओ आंदोलन : भाजपा सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात होळीचा सण साजरा होत आहे. होळीदहन म्हणजे वाईट विचार, प्रथा, परंपरा आगीत जाळून राख करावी आणि दुसऱ्या  दिवशी रंगोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. पण आजच्या (गुरुवारी) होळीच्या दिवशी विदर्भातील काही बेरोजगार तरुणांनी एकत्र येत आपल्या पदव्यांचीच होळी केली. विदर्भातील तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे या बेरोजगार तरुणांच्या पदव्या काही कामाच्या नाही, असे म्हणत विदर्भ राज्य आंदोलन समितीने बेरोजगारांच्या पदव्यांची होळी करून सरकारचा निषेध केला.नागपुरात संविधान चौकात विदर्भवादी कार्यकर्ते आणि बेरोजगार तरुणांनी पदव्यांची होळी केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरले आहेत. वर्षाला दोन कोटी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार, असे आश्वासन भाजपाने दिले. परंतु नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नवीन नोकरी मिळणे दूर ज्या नोकऱ्या होत्या त्याही गमावण्याची पाळी आहे. विदर्भात उद्योग येत नसल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही. जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही, तोपर्यंत विदर्भाचा विकास होणार नाही आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार नाही, असे मत विदर्भवादी तरुणांनी मांडले.नोकरी मिळत नसल्याने मेहनतीने घेतलेली पदवीही काही कामाची नाही. सरकारने विदर्भातील चार लाख नोकºया पळवल्या, असे म्हणत विदर्भातील स्थानिक नोकऱ्या विदर्भातील तरुणांनाच मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. आज पदव्यांची होळी करून सरकारचा निषेध करत स्वतंत्र विदर्भाची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. नागपूरसह विदर्भातील सर्वच भागात पदव्यांची होळी करण्यात आल्याचे यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सांगितले.राम नेवले यांच्यासह आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, राजकुमार नागुलवार, विजया धोटे, प्रभाकर काळे, मंगलमूर्ती सोनकुसळे, मुकेश मासूरकर, अभ्युदय कोसे, तारेश दुरुगकर, शुभम मून, राजेश बंड, रविना श्यामकुळे, डॉ. दीपक मुंडे, समीर खान, तौसीफ अहमद, हिमांशू देवघरे, रूपेश भोयर, ममता खापरे, कोमल दुरुगकर, अशोक धोटे, राजेश भांगे, अ‍ॅड. रेवाराम बेलेकर, रामेश्वर मोहबे, विजय जांगडे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन