शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:39 PM

टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देटाटा सुपर एसची दुचाकीला धडक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (उमरेड/कुही) : टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात योगिता सुमित वाढवे (२५), राजिता जगदीश कुमरे (२५) दोघेही रा. चांपा ता. उमरेड आणि प्रमोद श्रीराम उईके (४०) रा. तारणा ता. कुही यांचा मृत्यू झाला. तिघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी टाटा सुपर एसचा चालक शेख इमरान शेख मुश्ताक (३१) रा.मोठा ताजबाग, नागपूर याला कुही पोलिसांनी अटक केली आहे. 

तारणा येथील रहिवासी प्रमोद उईके हे दुचाकीने गिरड, जि.वर्धा येथे औषधोपचारासाठी जात होते. उमरेड तालुक्यातील चांपा येथून गिरडला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास तिघेही पॅशन प्रो गाडी क्रमांक एम.एच.४०/ए.वाय. ६७९१ ने निघाले. जात असतानाच उमरेड येथून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवित दुचाकीला टाटा सुपर एस मालवाहू गाडीची (एम.एच.४९/डी.४५९३) जोरदार धडक लागली. दुचाकी चालक प्रमोद उईके हा आपल्या मार्गाने जात असताना उलट दिशेने येणाऱ्या मालवाहु वाहनाची धडक लागली. अपघात इतका जोरदार होता की दुचाकी आणि टाटा सुपर एस ही दोन्ही वाहने चेंदामेंदा झाली. यामध्ये दुचाकी चालक प्रमोद उईके आणि योगिता वाढवे यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. राजिता कुमरे ही गंभीर जखमी झाली होती. अपघात होताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी उसळली. अनेकांनी मदतीचा हात दिला. पोलिसांना सूचना देण्यात आली. पाचगाव चौकी येथील पोलीस घटनास्थळी पोहोचले. लागलीच गंभीर अवस्थेत राजिता कुमरे यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान राजिता यांचीही प्राणज्योत मालविली. चारचाकी वाहनाच्या चालकास पोलिसांनी अटक केली असून २७९, २३७, ३३८, ३०४ अ, सहकलम १४४ कलमान्वये कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुहीचे पोलीस निरीक्षक पंजाबराव परघणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू