शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

‘त्या’ भूपाळीने नागपूर जिल्ह्यातले उमरेड हरखून जायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:34 AM

‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न उमरेडकरांच्यासमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांच्या कीर्तनाचा रंग न्यारा काळाच्या ओघात प्रार्थनेतील संख्या रोडावली

अभय लांजेवार ।आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘मलयगिरीचा चंदन गंधीत, धूप तुला दाविला... स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा...’ कुमार गंधर्व यांच्या सुरेल, आवाजाच्या जादुई भूपाळीने त्या काळात चांगलीच मोहिनी घातली होती. उमरेडकरांचीही पहाट याच भूपाळीने होत असे. मंगळवारीपेठ येथील गुरुदेव सेवाश्रमाच्या भव्य परिसरातील उंच झाडाला ‘भोंगा’ बांधला होता. अगदी पहाटे ४ वाजताच या भोंग्यातून ‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. उमरेडच्या कानाकोपऱ्यात ही भूपाळी जेव्हा पोहचायची तेव्हा रस्त्यारस्त्यावर सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या जायच्या. ‘त्या’ आनंदी क्षणांचे आजही अनेकजण साक्षीदार आहेत.दंग सदावर्ती, बालाजी चौधरी, सुखदेव किन्नाके, लक्ष्मण तारणेकर, वामन मुडपल्लीवार आणि मनोहर सदावर्ती यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांनी स्वत: उमरेड शहरात ‘गुरुदेव सेवाश्रम’ सुरू केला. होळकर गुरुजींचा हा शानदार वाडा पूर्वी ‘देवराज आश्रम’ म्हणून ओळखला जायचा. रोज सकाळी ध्यान आणि सायंकाळी सामूहिक प्रार्थनेसाठी लोकं येथे गोळा होऊ लागले. आजही नित्यनेमाने याठिकाणी ध्यान आणि प्रार्थना सुरूच आहे. केवळ माणसांची संख्या तेवढी रोडावली.अडगळीच्या एका खोलीत सध्या ध्यान आणि प्रार्थना होत असते. शिवाय, आताही मोठ्या झाडाला भोंगा अडकवलेला दिसतो. भोंगा वाजविणारे साहित्यही आहे. परंतु, ते निकामी झाले आहे. पुनश्च ‘उठी उठी गोपाळा’चे ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न त्यांच्या अनुयायांसमोर उभा ठाकला आहे.

राष्ट्रसंतांचा सेवाश्रमातच मुक्कामसन १९५७ नंतर राष्ट्रसंत जेव्हा या परिसरात कीर्तनासाठी येत असत, त्यावेळी ते या सेवाश्रमात मुक्कामी असायचे. सोबतच त्यावेळेस दहा ते बारा वेळा तुकडोजी महाराजांच्या कीर्तनाचा लाभ उमरेडकरांना मिळाला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या ‘शेतकरी’ या गंभीर विषयावर ‘त्या’ काळात (आज कुणीच बोलत नाही) महाराज पोटतिडकीने बोलत, जनजागृती करत. दारूबंदी, ग्रामस्वच्छता, विज्ञान, अध्यात्म, देशसेवा असे सर्वसमावेशक विषय ते हाताळत. ‘माणूस’ हा त्यांच्या कीर्तनाचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचा ‘रंगच न्यारा’ अशा जुन्या तेवढ्याच ताज्या आठवणी नामदेव राऊत, पंजाबराव आंभोरे मोठ्या उत्सुकतेने आजही व्यक्त करतात.पूर्णाकृती पुतळा११ आॅक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंतांच्या निधनाची वार्ता या परिसरात जेव्हा पोहचली तेव्हा सारेच हळहळले. त्यांच्या अंत्यविधीसाठी दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे असल्याने अनेकांनी रात्र जागून काढल्याचे दादाभाऊ नक्षिणे यांनी सांगितले. कालांतराने या सेवाश्रम परिसरात माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, नामदेव राऊत, पंजाबराव आंभोरे यांच्या पुढाकारातून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा साकारला गेला. अवतीभवती उंच वृक्षवल्लींमुळे हा परिसर अधिकच नयनरम्य झाला. या परिसराचा ‘विकास’ झाला पाहिजे आणि अधिकांश लोकांनी याकामी पुढाकार घ्यायला हवा, असा विचारप्रवाह पुढे येत आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक