नागपुरात तणावातून दोघा युवकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 23:55 IST2021-01-13T23:54:11+5:302021-01-13T23:55:47+5:30
Youths commit suicide due to tension मानसिक तणावातून दोन युवकांनी आत्महत्या केली. एकाने नोकरी न मिळाल्याने तर दुसऱ्याने मानसिकरित्या खचल्यामुळे आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नागपुरात तणावातून दोघा युवकांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानसिक तणावातून दोन युवकांनी आत्महत्या केली. एकाने नोकरी न मिळाल्याने तर दुसऱ्याने मानसिकरित्या खचल्यामुळे आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज यशवंत बोरकर (२१, रा. बजाज अपार्टमेंट, त्रिमूर्तीनगर) याने मंगळवारी सकाळी आपल्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ८ वाजता बहीण सोनाली त्याच्या रुमकडे गेली. तेव्हा सूरज फासावर लटकल्याचे आढळून आले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सूरजच्या व्हॉट्सॲप चॅटवरून तो तणावात असल्याची माहिती मिळाली आहे.
स्वप्नील काशिराम करुडकर (२४) रा. रामकृष्णनगर वाठोडा ले-आऊट हा पदवीधर होता. गेल्या तीन वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याने काही ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. परंतु त्याच्या पदरी निराशा आली. त्यामुळे तो तणावात होता. स्वप्नीलने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.