शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नागपुरात  दोन अपघातात दोघींचा मृत्यू  : अभियंता व प्राध्यापिकेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 8:24 PM

दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात दोघींचा मृत्यू झाला. यामध्ये युवा प्राध्यापिका व अभियंता यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकीचे वडीलसुद्धा जखमी : जरीपटका व गणेशपेठ येथील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात दोघींचा मृत्यू झाला. यामध्ये युवा प्राध्यापिका व अभियंता यांचा समावेश आहे. जरीपटका येथे झालेल्या अपघातातमृत्यू झालेल्या प्राध्यापिकेचे नाव मंजू नंदलाल परयानी आहे. तर गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव दिव्या गुलाबराव सोनटक्के आहे. या अपघातात दिव्याचे वडील सुद्धा जखमी झाले आहे.जरीपटका येथील रहिवासी मंजूर नंदलाल परयानी (२७) या कामठीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या शाळेत जाताना घरून दुचाकी घेऊन निघायच्या. दुचाकी इंदोरा येथील त्यांच्या मैत्रिणीकडे पार्क करून आर्मी पब्लिक स्कूलच्या बसने शाळेत जायच्या. सोमवारी सकाळी ७ वाजता त्या दुचाकी घेऊन निघाल्या, बाराखोली वस्तीतून जात असताना, रस्त्यावर पडलेल्या शेणावरून त्यांची दुचाकी गेल्यामुळे दुचाकी स्लीप झाली. त्या जोरदार रस्त्यावर पडल्या. दरम्यान त्यांच्या डोक्याला जखम झाली. परिसरातील लोकांनी त्यांना जनता रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मेयो रुग्णालयात पाठविले. मेयोच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन मशीन बंद असल्याचे सांगत खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे मंजू यांना सिम्स हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दुसरी घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्षधाम चौकात घडली. पुणे येथे स्वॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या दिव्या सोनटक्के (२९) ह्या लाडीकर लेआऊट येथे राहतात. दिव्या या वडील गुलाबराव यांना मॉरिस कॉलेजजवळील सीजीएचएस रुग्णालयातून घरी घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. वडील दुचाकी चालवित होते, तर दिव्या त्यांच्या मागे बसली होती. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम चौकाजवळ असताना मागून येणाऱ्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दिव्या मागे बसल्या असल्याने थेट बसच्या चाकात आल्या. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील गुलाबराव गंभीर जखमी झाले. गुलाबराव यांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

विद्यार्थिनीलाही चिरडलेबुधवारी सायंकाळी यादवनगर चौकात एका अनियंत्रित ट्रकने दुचाकी चालक अल्पवयीन विद्यार्थिनीला चिरडले. मृत विद्यार्थिनी यादवनगर येथील रहिवासी ताजीम फातिमा मो. हुसैन (१६) आहे. ती सायंकाळी ६.४५ वाजता दुचाकीवर आपल्या घरी जात होती. यादवनगर चौकाजवळ मागून आलेल्या ट्रकने फातिमाला जोरदार धडक दिली. फातिमा ही अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. आईला न सांगता ती दुचाकी घेऊन बाहेर पडली होती. तिचे वडील सीबीआयमध्ये कार्यरत असून, ते जम्मू-काश्मीर येथे नियुक्त आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाnagpurनागपूर