नागपुरात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:53 IST2021-02-27T23:52:40+5:302021-02-27T23:53:49+5:30
Accident death जबलपूर-हैदराबाद हायवेवर भरधाव वाहनाने जोरदार धडक मारल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला, तर दुसरा गंभीर आहे.

नागपुरात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जबलपूर-हैदराबाद हायवेवर भरधाव वाहनाने जोरदार धडक मारल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला, तर दुसरा गंभीर आहे. मृताचे नाव चैनलाल ताराचंद भोंगाडे (वय ५५, रा.बुटीबोरी), तर सुनील दयाराम लांजेवार (वय ३३, रा.पारडी) असे जखमीचे नाव आहे.
भोंगाडे आणि लांजेवार शुक्रवारी रात्री ७.३०च्या सुमारास दुचाकीने जात असताना, तरोडीच्या पुलाजवळ त्यांना भरधाव वाहनाने जोरदार धडक मारली. त्यामुळे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी भोंगाडे यांना तपासून मृत घोषित केले. लांजेवार यांच्यावर उपचार सुरू आहे. अशोक जियालाल लांजेवार (वय ३४) यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे.