शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

शॉक लागून नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू; टेंट उभारताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:08 IST

Nagpur : फलटणजवळ घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी नागपुरातील थांबलेल्या दोन वारकऱ्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मधुकर तुकारामजी शेंडे (५६, राजाबक्षा, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (२२) असे मृतक वारकऱ्यांची नावे आहेत. दोघेही निस्सिम विठ्ठलभक्त होते. शेंडे हे नेहमीप्रमाणे यंदादेखील उत्साहाने वारीत सहभागी झाले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता. 

बरड जवळील टोलनाका येथे मुक्कामसाठी टेंट उभारताना तुषार यांने लोखंडी रॉडला हात लावल्यानंतर त्यांना शॉक बसला. तुषार रॉडला चिटकल्याने त्यांना बाजूला काढण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव हेही तुषार यांना चिटकले. तेव्हा दोघांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी जवळच्या काही वारकऱ्यांनी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला कॉल केला. दोघांनाही उपचारासाठी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.

 याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली होती. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी ते जुळले होते. तसेच सत्संग व विविध धर्मकार्यातदेखील सहभागी व्हायचे. त्यांच्यावर सोमवार ३० जून रोजी दुपारी दोन वाजता नागपुरात अंत्यसंस्कार होतील अशी माहिती त्यांचे परिचित चंद्रकांत चकोले यांनी दिली. शेंडे व तरुण तुषार त्यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रवर्तुळात शोककळा पसरली असून विठ्ठलाचे दर्शन घेण्याअगोदरच असा प्रकार झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीnagpurनागपूरAccidentअपघात