नागपुरात कॉलेजवर हल्ला, दोन विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 22:24 IST2020-12-23T22:17:48+5:302020-12-23T22:24:40+5:30
Attack on college, crime news युवकांच्या एका समूहाने कॉलेज परिसरात हल्ला करून दोन विद्यार्थ्यांना जखमी केले. ही घटना कोराडीतील सेंट्रल इंडिया फार्मसी कॉलेज येथे घडली.

नागपुरात कॉलेजवर हल्ला, दोन विद्यार्थी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवकांच्या एका समूहाने कॉलेज परिसरात हल्ला करून दोन विद्यार्थ्यांना जखमी केले. ही घटना कोराडीतील सेंट्रल इंडिया फार्मसी कॉलेज येथे घडली. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली. १८ वर्षीय फैज अनवर हा त्याचा मित्र स्वप्निल कावळे व एजाज अली यांच्यासोबत बुधवारी सकाळी १०.१५ वाजता कॉलेजला जात होता. रस्त्यात एका ठिकाणी ते थांबले. त्याचवेळी बाईक क्रमांक एमएच-४० बीवाय-३९४५ वर स्वार एक युवक अनवरजवळ आला त्याने कट का मारला म्हणत शिवीगाळ करीत वाद घालू लागला. अनवर कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर सहा-सात युवक आले. त्यांनी कॉलेज परिससरात गोंधळ घालत ते अनवरला गेटजवळ घेऊन जाऊ लागले. ते पाहून अनवरचे मित्र तापसीर व शहजाद त्याला वाचवायला आले. त्यामुळे आरोपींनी काठ्या आणि पाईपने त्यांच्यावर हल्ला केला. यात तापसीर व शहजाद जखमी झाले. कोराडी पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.