शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित

By सुमेध वाघमार | Updated: January 7, 2025 14:06 IST

जिल्हाधिकारी इटनकर : एम्स व पुण्यातील प्रयोगशाळेचा अहवालानंतरच होणार पुष्टी

सुमेध वाघमारे नागपूर : नागपुरात अद्यापही ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’च्या (एचएमपीव्ही) रुग्णाची नोंद झाली नाही. जे दोन रुग्ण आढळून आले ते संशयित आहेत. त्यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) व पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच आजाराची पुष्टी केली जाइल अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.     

प्रसारमाध्यमांवर ‘एचएमपीव्ही’चे दोन रुग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने उपराजाधनीत खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी याला खोडून काढत ते रुग्ण संशयीत असल्याचे सांगितले. डॉ. इटनकर म्हणाले, संशयित रुग्णांमध्ये १४ वर्षांची मुलगी व ७ वर्षांचा मुलगा आहे. त्यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने एका खासगी रुग्णालयातच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ‘एचएमपीव्ही’ पॉझिटीव्ह आले. मात्र, शासकीय प्रयोगशाळेतून त्याची पुष्टी होणे गरजेचे आहे. म्हणून ‘एम्स’ व पुण्याच्या प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात आले आहेत. यात त्यांची त्याची ‘जिनोम सिक्वेंसिंग केली जाइल, तसेच ‘सिटी व्हॅल्यू २५’च्या खाली आल्यास आवश्यक उपाययोजना केल्या जातील. दोन दिवसांत तपासणीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. या विषाणूबाबत आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्टÑीय रोग नियंत्रण कें द्राच्या संचालकांनी मार्गदर्शकतत्वे प्रसीद्ध केले आहे. हा विषाणू आपल्यासाठी नवीन नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. गरज पडल्यास स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येइल, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसnagpurनागपूर