शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

नागपुरात व्हेंटिलेटरअभावी दोन रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:38 PM

मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर कदाचित दोघांचाही जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमेडिकल कॉलेज इस्पितळातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर कदाचित दोघांचाही जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.युवराज यादवराव वैतागे (५५) रा. वैतागे भवन, महाल व मोरेश्वर धवंडे (४६) रा. नागपूर अशी मृतांची नावे आहेत. युवराज यांना अमरावतीहून सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास मेडिकल रुग्णालयातील वार्ड क्र. २६ मध्ये भरती करण्यात आले. त्यांना ‘प्लाझ्मा’ देण्यात आला. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासाची (व्हेन्टिलेटर) गरज होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले. परंतु, व्हेन्टिलेटर नसल्यामुळे डॉक्टरांनी नाईलाजाने ‘बॅग अ‍ॅण्ड मास्क व्हेन्टीलेशन’मधून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यास सांगितले. मात्र दुपारी प्रकृती खालवल्याने दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी युवराज यांना मृत घोषित केले. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात मोरेश्वर धवंडे भरती होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. मोरेश्वर यांनाही व्हेन्टिलेटरची गरज होती. व्हेन्टिलेटर मिळाले असते तर त्यांचाही जीव वाचला असता, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयDeathमृत्यू