हत्या करून फरार होऊ पाहणारे दोन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 00:11 IST2021-07-02T00:10:57+5:302021-07-02T00:11:25+5:30
murder accused arrested पंजाब आणि हैदराबाद येथे हत्या करून फरार होऊ पाहणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा, सीताबर्डी पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने पकडले.

हत्या करून फरार होऊ पाहणारे दोन आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पंजाब आणि हैदराबाद येथे हत्या करून फरार होऊ पाहणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा, सीताबर्डी पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने पकडले.
अनिल सिंग आणि शिवराम सिंग अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी हैदराबाद येथून हत्या करून रेल्वेने पळुन जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार शहर गुन्हेशाखेने सीताबर्डी पोलीस, गणेशपेठ पोलिसांना सोबत घेऊन लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने रेल्वेगाडी क्रमांक ०२७८७ हैदराबाद-हजरत निजामुद्दीन हमसफर एक्स्प्रेसमध्ये शोध मोहिम राबविली. ही गाडी दुपारी २.४० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. यावेळी दोन्ही आरोपी या गाडीने प्रवास करीत असताना त्यांना पकडण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पवन मोरे, नेरकर, गणेशपेठचे निरीक्षक भारत क्षीरसागर, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस आणि त्यांचे सहकारी पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक विजय तायवाडे, चंदु मदनकर, योगेश घुरडे, प्रविण खवसे, रोशन मोगरे, मुकेश नरुले, पुष्पराज मिश्रा, आरपीएफचे भुपेंद्र बाथरी यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.