नागपुरात पुन्हा दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 22:22 IST2020-09-18T22:21:30+5:302020-09-18T22:22:47+5:30
शहर पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक फौजदार रवींद्र नामदेवराव उके (वय ५३) तसेच हवलदार परमानंद पांडुरंग राघोर्ते (वय ५५) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नागपुरात पुन्हा दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक फौजदार रवींद्र नामदेवराव उके (वय ५३) तसेच हवलदार परमानंद पांडुरंग राघोर्ते (वय ५५) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उके इंदोरा वाहतूक शाखेत कार्यरत होते. ते फायर कॉलेज जवळच्या प्रेरणा अपार्टमेंटमध्ये राहायचे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. शुक्रवारी डॉक्टरांनी उके यांना मृत घोषित केले. उके यांच्या परिवारात पत्नी ललिता, मुलगी अनुपमा (वय २३) आणि निखिल (वय १९) नामक मुलगा आहे.
तर,राघोर्ते एमआयडीसी वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांनी गुरुवारी रात्री मृत घोषित केले.
शहर पोलीस दलातील कोरोनाने आतापर्यंत १६ बळी घेतले असून बधितांची संख्या २३०० च्या घरात पोहोचली आहे.