मनपा स्टेशनरी घोटाळ्यातील आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 12:07 IST2021-12-20T11:03:25+5:302021-12-20T12:07:18+5:30
नागपूर : महापालिकेत झालेल्या लाखो रुपयांच्या स्टेशनरी घोटाळ्यात रविवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली. महापालिकेतील ऑडिटर आणि क्लर्कचा यात ...

मनपा स्टेशनरी घोटाळ्यातील आणखी दोघांना अटक
नागपूर : महापालिकेत झालेल्या लाखो रुपयांच्या स्टेशनरी घोटाळ्यात रविवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली. महापालिकेतील ऑडिटर आणि क्लर्कचा यात समावेश आहे. स्टेशनरी घोटाळ्यात या दोघांची महत्वाची भूमिका असल्याचे मानण्यात येत आहे.
या घोटाळ्यातील चौघांना आतापर्यंत सदर पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे ऑडिटर मोहम्मद अफाक अहमद आणि क्लर्क मोहन रतन पडवंशी या दोघांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. यापूर्वी स्टेशनरीचा पुरवठा करणारा अतुल साकोरे आणि पद्माकर साकोरेला अटक करण्यात आली होती.
चौकशीत त्यांनी अफाक आणि मोहनचा हात असल्याची कबुली दिली. त्या आधारे रविवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली. मोहनने संबंधित वेबसाईटवर घोटाळ्याची फाईल अपलोड केली होती तर अफाकने पडताळणी केल्याविना फाईलवर स्वाक्षरी करून बिल मंजूर केले होते. तपासात आणखी गंभीर खुलासे होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.