भिवापूर: वीज कोसळून मांगली येथे दोन मजुरांचा मृत्यू

By सुनील चरपे | Updated: September 11, 2022 21:26 IST2022-09-11T21:25:05+5:302022-09-11T21:26:08+5:30

शेतातून घरी परत येत असताना जाेरात कडाडलेली वील थेट रेंगीवर काेसळली.

two labourers died in bhiwapur mangli due to lightning | भिवापूर: वीज कोसळून मांगली येथे दोन मजुरांचा मृत्यू

भिवापूर: वीज कोसळून मांगली येथे दोन मजुरांचा मृत्यू

भिवापूर : शेतातून घरी परत येत असताना जाेरात कडाडलेली वील थेट रेंगीवर काेसळली. यात रेंगीत बसलेल्या दाेन मजुरांचा हाेरपळून मृत्यू झाला. सुदैवाने दाेन्ही बैल सुखरूप राहिल्याने त्यांनी मजुरांना आहे त्या अवस्थेत घरापर्यंत आणले. ही घटना भिवापूर तालुक्यातील मांगली (जग.) येथे रविवारी (दि. ११) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

ओमेश्वर पोपटकर (४८) व गुंडेराव गेडाम (५०) दाेघेही रा. मांगली (जग.) अशी मृतांची नावे आहेत. ते प्रवीण जळीत यांच्या शेतात कामाला गेले हाेते. सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी रेंगीला बैल जुंपले आणि घराची वाट धरली. वाटेत जाेरात कडाडलेली वीज थेट त्यांच्या रेंगीवर काेसळली. त्यात दाेघेही हाेरपळले. दाेन्ही बैल सुखरूप असल्याने त्यांनी दाेघांनाही घरी आणले. त्यानंतर हा प्रकार घरच्या मंडळींसह नागरिकांना माहिती झाला. ओमेश्वरचा मृतदेह रेंगीत तर गुंडेरावचा वाटेत पडून हाेता. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून महसूल विभागानेही नाेंद केली आहे.

Web Title: two labourers died in bhiwapur mangli due to lightning

टॅग्स :nagpurनागपूर