नागपूर जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:04 IST2019-10-18T00:03:58+5:302019-10-18T00:04:38+5:30

भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबोरी-उमरेड मार्गावरील कोलार शिवारात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

Two killed in vehicle collision in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देबुटीबोरी-उमरेड रोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (बुटीबोरी) : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबोरी-उमरेड मार्गावरील कोलार शिवारात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
पुण्यवसू राजू शेंदरे (१९) व गणेश मनोहर वावधने (१९) दोघेही रा. शिरुळ, अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मित्र असून, बुटीबोरी एमआयडीसीमधील कंपनीमध्ये काम करायचे. त्यांना गुरुवारी सुटी असल्याने ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते एमएच-४०/एझेड-३७६८ क्रमांकाच्या मोटरसायकलने गावी परत जात असताना, भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
धडक देताच वाहनचालक वाहनासह पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. या घटनेमुळे शिरुळ येथे शोककळा पसरली होती. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Two killed in vehicle collision in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.