शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

उपराजधानीत गुन्हेगारी उफाळली : २४ तासांत महिलेसह दोघांची हत्या, तिघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:27 AM

Murder उपराजधानीत अवघ्या २४ तासांत दोन हत्या आणि पोलिसासह तिघांच्या हत्येचा प्रयत्न झाला. विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे गुन्हेगारी उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत अवघ्या २४ तासांत दोन हत्या आणि पोलिसासह तिघांच्या हत्येचा प्रयत्न झाला. विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे गुन्हेगारी उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज शुक्रवारी एकाच दिवशी हत्येच्या दोन थरारक घटना घडल्या. सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाची त्याच्या प्रतिस्पर्धी गुंडांनी हत्या केली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच एमआयडीसीत एसआरपीएफच्या एका निवृत्त कर्मचारी महिलेचीही हत्या झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, एमआयडीसीत गुरुवारी पहाटे एका तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाला. गुरुवारी सायंकाळी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला, तर शुक्रवारी सकाळी नंदनवनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही एका गुंडाने घातक शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या रक्तरंजित घटनांमुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

एमआयडीसी

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पच्या मागे सप्तकनगर आहे. येथे विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) राहत होत्या. विजयाबाई एसआरपीएफच्या मेसमध्ये कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्या स्वतःच्या घरात सप्तकनगरात राहायला गेल्या. त्यांचा मुलगा अमोल एसआरपीएफमध्ये सेवारत असून, तो वेगळा राहतो. त्यांना दोन विवाहित मुलीसुद्धा आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास मोलकरीण त्यांच्याकडे कामाला गेली असता विजयाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर एमआयडीसी पोलिसांना कळविले. माहिती कळताच ठाणेदार युवराज हांडे, तसेच एमआयडीसी पोलीसचा ताफा, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी पोहोचले. एकट्या राहणाऱ्या वृद्ध विजयाबाई यांची हत्या कोणी आणि का केली असावी, ते वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. मात्र, लुटमारीच्या उद्देशानेच ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलीस अधिकारी वर्तवीत आहेत

रात्री उशिरा ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथक बोलावून घेतले. श्वान आजूबाजूच्या भागात घुटमळले. त्यातून पोलिसांच्या हाती ठोस असे काही मिळाले नाही.

कोतवाली

ही घटना उघड होण्यापूर्वी जुन्या वैमनस्यातून गुंडाच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानू ऊर्फ शहानवाज नासीर खान याची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास गांधी गेट महाल भागात ही थरारक घटना घडली.

शानू हा कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएसह विविध कारवाईदेखील केली होती. त्याला महिनाभरापूर्वी तडीपारही करण्यात आले होते.

तीन वर्षांपूर्वी त्याने कुख्यात प्रवीण घाटेवर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून घाटे टोळीसोबत त्याचे वैमनस्य आले होते. शानूचा गेम करण्यासाठी ते संधी शोधत होते. या पार्श्वभूमीवर, ईद साजरी करण्यासाठी शानू घरी परतला. तो आज सकाळी दुचाकीने जात असताना दिसताच त्याच्या मागावर असलेले सौरभ घाटे आणि त्याच्या टोळीतील राजा ऊर्फ अर्शद शेख याने पाठलाग करून त्याला गांधी गेटजवळ गाठले आणि शस्त्राचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली.

ही माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही तेथे भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला.

याप्रकरणी आरोपी सौरभ घाटे आणि अर्शद आणि मुख्य सूत्रधार प्रवीण घाटे या तिघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

पोलिसावर हल्ला

या घटनेपूर्वी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्सा मशीदजवळ पोलीस हवालदार सुनील पांडुरंग शिंदे हे आज सकाळी ९ वाजता कर्तव्य बजावत होते. तेथे आरोपी शेख रशीद शेख नजीर (४०) पोहोचला. त्याने हवालदार शिंदे यांच्या समोर येऊन त्यांना ‘तू येथून निघून जा. आमच्या लोकांना नमाज पडायची आहे. तू लवकर नीघ, नाही तर तुला जिवे ठार मारेन’, असे म्हणून वाद घातला. त्यानंतर धारदार शस्त्र काढून हवालदार शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. शिंदे यांच्या गळ्यावर आरोपीने वार केला. तो शिंदे यांनी हुकवला. नंतर हाताला, नाकाला आणि दंडावर घात बसल्याने ते जबर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आजूबाजूचे पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्ते धावले. त्यांनी आरोपी शेख रशीदला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला नंदनवन पोलिसांनी अटक केली.

हुडकेश्वर

जयहिंदनगर येथे ऋषिकेश आणि त्याचा भाऊ अमित मनोज पाटील राहतात. हे दोघे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पांडव कॉलेज ग्राउंडवर आले असताना तेथे आरोपी रोहित विजय तिडके (२०) याने त्यांच्याशी वाद घातला, तसेच धारदार शस्त्राने ऋषिकेशच्या पोटावर मारून त्याला गंभीर जखमी केले. अमित पाटीलच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी तिडकेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

या सर्व घटनांपूर्वी एमआयडीसीत गुरुवारी पहाटे सम्राट विजय सिंग नामक तरुणाचा गळा धारदार शस्त्राने कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत, हे विशेष

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर