शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ये क्या हो रहा है... नागपुरात २४ तासांत विनयभंगाच्या दोन घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:15 IST

कपिलनगर, हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : विधीमंडळ अधिवेशन तोंडावर असताना नागपुरात विनयभंगाच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २४ तासांत विनयभंगाच्या दोन घटना समोर आल्या. कपिलनगर, प्रतापनगर व हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

पहिली घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अभिजित ऊर्फ काली दीपक ठाकूर (२२, कपिलनगर) याची १९ वर्षीय मुलीशी ओळख होती. त्यांच्यात मैत्रीदेखील होती. त्याच्याशी भांडण झाल्याने तिने बोलणे बंद केले होते. यामुळे अभिजित व्यथित झाला होता. तो वारंवार तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. ती मैत्रिणीसोबत दुचाकीने महाविद्यालयात जात असताना त्याने तिला जबरदस्तीने थांबविले. तू बोलली नाहीस तर तुझ्या भावाला ठार मारेन, अशी त्याने धमकी दिली. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली. तिने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अभिजितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ३६ वर्षीय महिला एका कंपनीत कामाला असून त्याच कंपनीतील सुरक्षा अधिकारी धनराज लक्ष्मणराव चौधरी (४२, पिपळा हुडकेश्वर) याने तिचा विनयभंग केला. नोकरीवर राहायचे असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असा दबाव त्याने बनविला. तसेच तिचा विनयभंग केला. महिलेने नकार दिला असता त्याने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. तिने काही परिचितांना आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हिंगणा पोलिस ठाण्यात चौधरीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.

ट्यूशन क्लासमध्ये मुलीची काढली छेड 

प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुभम निळकंठ चिचोने (२३, गोंडवाना सोसायटी, मनिषनगर) याने एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. गुरुवारी सकाळी सव्वासात वाजता ती कोचिंग क्लासला जात होती. शुभमची तिच्याशी ओळख होती. काही दिवसांपासून ती त्याच्याशी बोलत नव्हती. शुभम तिच्या क्लाससमोर गेला व बोलत का नाही, अशी विचारणा केली. तिचा हात पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभमला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर