नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत दोघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 20:43 IST2019-08-20T20:41:04+5:302019-08-20T20:43:02+5:30

येथील कन्हान नदीच्या पात्रात सोमवारी रात्री सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Two drowned in Kanhan river in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत दोघांचा बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत दोघांचा बुडून मृत्यू

ठळक मुद्देएकाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (मौदा): येथील कन्हान नदीच्या पात्रात सोमवारी रात्री सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. संदुराम नेहरुराम पडवाड (२६) व अमरित रामधीन निसाद (२१) दोघेही रा. कोरबादरी, ता. काटघोरा, जि. कोरबा (छत्तीसगड) अशी मृत युवकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार सोमवारी सायंकाळी दोघेही कन्हाननदीवर मासे पकडण्यासाठी खोल पाण्यात गेले असता बुडून वाहून गेले. रात्री पर्यंत पोलिसांनी शोधले असता सापडले नाही. मंगळवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन शोध पथकाला संदुराम नेहरुराम पडवाड यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला तर दुसºयाचा अजूनपर्यंत शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत सांगळे, नायब तहसीलदार दिनेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक मधुकर गीते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत शोधमोहिमेला वेग दिला होता.

Web Title: Two drowned in Kanhan river in Nagpur district