लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसी आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह दोघांचा करुण अंत झाला.हिंगणा मार्गावरील अमरनगरात राहणाऱ्या इंदिरा चंद्रपाल उके (वय ५०) या सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास हिंगणा मार्ग ओलांडून झोन चौकातून अमरनगरकडे जात होत्या. अचानक वेगात आलेल्या ट्रक (एमपी ०९/केडी ६९१५)च्या चालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. या अपघातामुळे तणाव निर्माण झाला. माहिती कळताच एमआयडीसी पोलीस तेथे पोहचले. युवराज चंद्रपाल उके (वय २४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रकचालक अब्दुल कुद्दूस अब्दुल कयूम (वय ४३, रा. बार्शीटाकळी, जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.अशाच प्रकारे सोमवारी रात्री ९ ते ९.१५ च्या सुमारास भरधाव ट्रकने अॅक्टिव्हा चालक डेव्हिड कमील लाकडा (वय ३२, रा. द्रुगधामना, वाडी) यांना धडक दिल्याने त्यांचा करुण अंत झाला. मौजा वडधामना सिमेंट सीट फॅक्टरीसमोर हा भीषण अपघात घडला. कोहिनूर रंजित रामटेके (वय २०, रा. आठवा मैल) याच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:04 IST
एमआयडीसी आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह दोघांचा करुण अंत झाला.
नागपुरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोन ठार
ठळक मुद्देहिंगणा मार्ग झोन चौकात तणाव