झुंज देत दोन सांड पडले विहिरीत, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:36 IST2020-04-23T21:33:24+5:302020-04-23T21:36:22+5:30
पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला.

झुंज देत दोन सांड पडले विहिरीत, एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. तर दुसºयाला अग्निशमन विभागाच्या पथकाने बाहेर काढले. बाहेर काढताच या सांडाने धूम ठोकली. सांडांची झुंज बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. नीलेश बुरकेवार यांच्या भूखंडावर खोदण्यात आलेल्या ४ फूट व्यासाच्या २५ फूट खोल विहिरीत दोन्ही सांड पडले.
सांड विहिरीत पडल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच सक्करदरा केंद्राचे पथक घटनास्थळी पोहचले. विहीर खोल असल्याने खाली पडताना जखमी झाल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याला पथकातील जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या परिसरात मोकाट सांडांमुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेने या सांडांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.