आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक
By योगेश पांडे | Updated: May 25, 2023 17:26 IST2023-05-25T17:25:40+5:302023-05-25T17:26:48+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाची कारवाई

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना अटक
नागपूर : आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
बुधवारी लखनऊ विरुद्ध मुंबईच्या सामन्यादरम्यान प्रवीण गोपीचंद लुटे (३९, तुळशीबाग रोड, कोतवाली) व परेश सारवाणी (वर्धमान नगर, लकडगंज) हे फोनच्या माध्यमातून सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना कळाली. सामना सुरू असतानाच गरोबा मैदानाजवळील एका घरात धाड टाकून पोलिसांनी लुटेला अटक केली. तर परेश पसार झाला. लुटेच्या ताब्यातून पोलिसांनी पाच फोन, टीव्ही, सेटटॉप बॉक्स, डोंगल, चार्जर, कागदपत्रे व रोख असा ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक महेश सागडे, पवन मोरे, सचिन भोंडे, मुकेश राऊत, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, संतोष चौधरी, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.