शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

ड्रॅगन पॅलेस टेम्पला वीस वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 9:05 PM

कामठीच नव्हे तर संपूर्ण नागपूरची एक ओळख बनलेला वैभवसंपन्न शांती शिल्प जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला २० वर्षे पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देकार्तिक पौर्णिमेला वर्धापन दिन : जपानी भिक्षु संघाच्या उपस्थितीत धम्मदेसना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठीच नव्हे तर संपूर्ण नागपूरची एक ओळख बनलेला वैभवसंपन्न शांती शिल्प जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला २० वर्षे पूर्ण होत आहे. येत्या कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर वर्धापन दिनानिमित्त १२ नोव्हेंबर रोजी ओगावा सोसायटीच्यावतीने ड्रॅगन पॅलेस टेम्पल दादासाहेब कुंभारे परिसर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जपान येथील प्रमुख विविध बुद्ध विहारांमधील वंदनीय प्रमुख भदंत व भिक्षुसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना होईल. अध्यक्षस्थानी जपान येथील आंतरराष्ट्रीय निचिरेन शु फेलोशिप असोसिएशनचे प्रमुख पूज्य भदंत कानसेन मोचिदा राहतील. यासोबतच भदंत कानसेन हासेगावा, भदंत कोशुन आकीझाकी, भदंत शिंग्यो इमाई, भदंत होशीन कावागिशी, भदंत कोशु सुजुकी, भदंत शिंक्यो यामागुची, भदंत हिदेकी तेरानिशी, भदंत गाक्युग्यो मत्सुमोेटो आदींसह जपान येथील प्रमुख २८ बुद्ध विहारातील प्रमुख भदंत तसेच बौद्ध प्रतिनिधी उपस्थित राहतील.नोरिको ओगावा यांना अभिवादनड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या महादानदात्या नोरीको ओगावा यांचे दीर्घ आजाराने गेल्या २ सप्टेंबर रोजी जपान येथे निधन झाले. दिवंगत ओगावा यांच्या महादनातूनच ड्रॅगन पॅलेस टेम्पलची निर्मिती होवू शकतील. बुद्धभूमी असलेल्या भारतात ड्रॅगन पॅलेस टेम्ल उभारल्याचे त्यांना मोठे समाधान होते. २० व्या वर्धापन दिनी जपान येथील भिक्षु संघाच्या उपस्थितीत त्यांना श्रेद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात येईल, असे टेम्पलच्या प्रमुख अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिरnagpurनागपूर