शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

नागपुरात पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी केले सामूहिक योगासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 7:43 PM

जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी यांच्या स्मृतीत आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा शनिवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतून जवळपास २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजनार्दन स्वामी योगाभ्यासाठी मंडळाचे आयोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : नियमित योगासन केल्यास संयम, धैर्य प्राप्त होते, एकाग्रता वाढते. त्याचे चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर व अभ्यासावर होतात. त्यामुळे विज्ञार्थी मित्रांनो करा हो नियमित योगासन असे आवाहन जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना केले.जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी यांच्या स्मृतीत आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा शनिवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, शशी वंजारी, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेवक सुनील हिरणवार, संजय बंगाले आदी उपस्थित होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतून जवळपास २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजतापासून योगासन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या सुरुवातीला ईश्वर प्रणिधान आणि गुरूचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर योगासन, प्राणायम, ओंकाराचा जप व शांतिमंत्र आदी योग प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. योगासनाचा हा भव्य सामूहिक उपक्रम माझ्या सासुबाईच्या स्मृतीत आयोजित करण्यात आल्याबद्दल आयोजकांचे आभार कांचन गडकरी यांनी मानले. तसेच विद्यार्थ्यांना ‘योग करोंगे तो मस्त रहोंगे, मस्त रहोंगे तो स्वस्थ रहोंगे’ असा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये योगसंस्कार रुजविण्यासाठी जनार्दन स्वामी मंडळाच्या उपक्रमाचे महापौर नंदा जिचकार यांनी कौतुक केले. यावेळी विविध शाळांना विविध प्रकारात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. योगाला जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणारयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून योग शिकविला जावा. त्यातून विद्यार्थी प्रेरित होऊन पुढच्या वर्षी आंतरशालेय योगासनाचा हा सामूहिक सोहळा कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित करून, ५० हजारावर विद्यार्थी यात सहभागी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. स्पर्धेत या शाळांनी पटकाविले पुरस्कारसर्वोत्कृष्ट पारितोषिक : मॉर्डन नीरी स्कूल, श्रेयस माध्यमिक शाळा वर्धमाननगर, भारतीय कृषी विद्यालयसांघिकता : श्रेयस माध्यमिक विद्यालय, मॉर्डन नीरी स्कूल, सोमलवार रामदासपेठलयबद्धता : दयानंद आर्य कन्या शाळा, हिंदू ज्ञानपीठ, भारतीय कृषी विद्यालयतालबद्धता : मनपा शाळा दुर्गानगर, सोमलवार निकालस खामला, शाहू गार्डन बेसाआसनकृती : स्कूल आॅफ स्कॉलर्स वानाडोंगरी, विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळा, हिंदू मुलींची शाळाआसनगती : हडस विद्यालय, साऊथ इस्टर्न रेल्वे प्रतापनगर, विनायकराव देशमुख विद्यालय शांतिनगरआसनपूर्णा स्थिती : केशवनगर विद्यालय, हंसकृपा स्कूल, भारत विद्यालयसंख्या : विनायकराव देशमुख विद्यालय लकडगंज, सोमलवार निकालस खामला, मनपा संजयनगर स्कूल, मिनीमातानगरमौन : मुंडले पब्लिक स्कूल, मनपा स्कूल जयताळा, सरस्वती विद्यालय सीताबर्डीअथयोगानुशासन : जे.पी. इंग्लिश स्कूल, जिंदल पब्लिक स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलगणवेश : राही पब्लिक स्कूल, टाटा पारसी स्कू ल, सरस्वती विद्यालयविशेष पुरस्कार : मूकबधिर विद्यालय, सावनेर.

टॅग्स :YogaयोगStudentविद्यार्थी