वन्यजीव तस्करांकडून कासव, पोपट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:05+5:302021-04-16T04:09:05+5:30

नागपूर : वनविभागाने केलेल्या कारवाईत तीन वन्यजीव तस्करांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोपट आणि कासव जप्त करण्यात आले. वर्धा ...

Turtles, parrots seized from wildlife smugglers | वन्यजीव तस्करांकडून कासव, पोपट जप्त

वन्यजीव तस्करांकडून कासव, पोपट जप्त

Next

नागपूर : वनविभागाने केलेल्या कारवाईत तीन वन्यजीव तस्करांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोपट आणि कासव जप्त करण्यात आले. वर्धा येथील पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ती पीपल फॉर अ‍ॅनिमल्स युनिट- २ नागपूरच्या संस्थेला दिली. या आधारावर अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनात मानद वन्यजीवरक्षक अजिंक्य भटकर, ॲण्टी पोचिंग टीमचे आरएफओ आशिष निनावे, क्षेत्र सहायक मंगेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सेमिनरी हिल्स नागपूरचे विजय गंगावने, आशिष कोहळे (पीएफए युनिट- २), पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने, वनविभाग एसआरपीएफ टीम व वनविभाग कर्मचारी यांच्या समन्वयाने योजना आखण्यात आली. त्यानुसार सायंकाळी पोपट खरेदीसाठी जागा ठरली. पोपट विक्री करणारे येताच त्यांना अटक करण्यात आली. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदित्य पाटील, प्रशांत ढोले यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तुषार शिपी यांच्या घरी धाड टाकून २ टोई प्रजातींचे पोपट जप्त करण्यात आले. तेथूनच आरोपी प्रशांत ढोले याच्या कपिलनगर येथील घरी झडती घेतली असता, दोन रुफ्ड कासव व एक सिंगापूर कासव आढळले. हे प्राणी व पक्षी वैद्यकीय तपासणीसाठी जप्त करण्यात आले. एकूण ७ टोई प्लम हेडेड पर्कीट प्रजातीचे शेड्युल चारमध्ये येणारे पोपट, शेड्युल एकमधील रुफ्ड प्रजातीचे दोन कासव जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला.

यातील एक पोपट अंदाजे २ ते ३ हजार रुपये किमतीचा असून कासव दीड ते तीन हजार रुपये किमतीचे आहे. जप्त केलेले पोपट व कासव वैद्यकीय तपासणीसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविले असून लवकरच नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहेत. या कारवाईत पीपल फॉर अ‍ॅनिमल्स संस्थेचे रोहित कंगाले, ओमकार राऊत, निलेश रामटेके, आदित्य वैरागडे, सुरज राऊत, जीवन चौधरी यांचा समावेश होता.

Web Title: Turtles, parrots seized from wildlife smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.