शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

क्षयरोग गंभीर परंतु आटोक्यात येणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:05 PM

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देअधिष्ठाता निसवाडे : मेडिकलमध्ये जागतिक क्षयरोग दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. यासाठी वेळोवेळी त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. शासकीय दृष्टिकोनातून हा आजार शासकीय रुग्णालयांपर्यंतच मर्यादित होता आता खासगी डॉक्टरांनाही यात सामावून घेतल्याने याची व्याप्ती वाढली आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.मेडिकलच्या रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. माध्यमा चहांदे, रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम व मेट्रन जोसेफ आदी उपस्थित होते.डॉ. निसवाडे म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधांपासून ते यंत्रसामूग्री पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करते परंतु त्यांच्यावर उपचार वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर करतात. परिणामी, जबाबदारी निश्चित होत नाही. यात संशोधनालाही वाव राहत नाही. शासनाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.अनिल हिरेखण म्हणाले, गेल्या दक्षकापासून क्षयरोग संपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. परंतु क्षयरोगामुळे होणाऱ्या  मृत्यूंचे प्रमाण अद्यापही लक्षणीय आहे. यामुळे रोगाचा समूळ नाश करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक डॉ. सुशांत मेश्राम यांनी केले. संचालन डॉ. सायली कडमे यांनी केले तर आभार डॉ. नाजीया यांनी मानले. यावेळी पूर्णत: बरे झालेल्या क्षयरोगाच्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. राज गजभिये, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. योगेंद्र बन्सोड, डॉ. वृंदा सहस्त्रभोजने यांच्यासह परशुराम दोरवे आदी उपस्थित होते.क्षयरोगाने दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यूडॉ. सुशांत मेश्राम यांनी आपल्या प्रास्तविकात म्हटले की, देशात क्षयरोगाचे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. यात दरवर्षी ७ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे, या रोगामुळे साधारण ३ लाख मुलांना शाळा सोडावी लागते. कर्तापुरुष क्षयरोगाला बळी पडत असल्याने दरवर्षी १ लाख महिला विधवा होतात. क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकत असताना ही आकडेवारी भयावह आहे. यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राने यात पुढाकार घेऊन क्षयरोगाशी लढा देणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealth Tipsहेल्थ टिप्स