‘हाफकिन’ फार्मा कंपनी म्हणून चालवण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:00 IST2017-12-18T23:58:35+5:302017-12-19T00:00:27+5:30
पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिकस्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

‘हाफकिन’ फार्मा कंपनी म्हणून चालवण्यासाठी प्रयत्न करणार
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिकस्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाफकिन महामंडळात पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना बापट म्हणाले की, पोलिओ निर्मूलनासाठी लस निर्मितीच्या कामात हाफकिनचे मोठे कार्य आहे. पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल्ी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी भाग घेतला.
जळगाव युनिट बंद करणार नाही
जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
सदस्य सर्वश्री डॉ. सतीश पाटील, राहुल जगताप, प्रदीप नाईक आदींनी जळगाव येथील हाफकिन युनिट बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बापट यांनी म्हटले आहे की, हाफकिन महामंडळाचे सहयोगी कंपनी असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मा लिमिटेड, जि. जळगाव युनिटमध्ये केवळ क्षार संजीवनी, प्रतिजैवके, ज्वरनाशकाची औषधे, क्षयरोग औषधे, पोटदुखी व अॅलर्जीवरील औषधे यांचे उत्पादन करण्यात येते. या युनिटमध्ये पोलिओची लस अथवा इंजेक्शनचे उत्पादन केले जात नाही. हाफकिन व्यवस्थापकीय संचालक मंडळाकडून हाफकिनचे जळगाव येथील युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असेही लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.