शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

कागदावर अंगठा घेऊन जमीन हडपण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 11:12 IST

आजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांचा कागदपत्रावर अंगठा घेतल्यानंतर भागीदाराने कोट्यवधीच्या जमिनीला हडपण्याचे प्रयत्न चालविल्याची तक्रार संबंधित दिवंगत वृद्धेच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे.

ठळक मुद्देआजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदामुलाची पोलिसांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांचा कागदपत्रावर अंगठा घेतल्यानंतर भागीदाराने कोट्यवधीच्या जमिनीला हडपण्याचे प्रयत्न चालविल्याची तक्रार संबंधित दिवंगत वृद्धेच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे. देवेश चंद्रकांत वाघमारे असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते धंतोलीत राहतात.त्यांनी बेलतरोडी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आई सुशीला चंद्रकांत वाघमारे आणि मोहम्मद इस्माईलखान उस्मानखान यांच्या संयुक्त मालकी हक्काची जमीन मौजा बेलतरोडी (खसरा क्र. १४२/ २) येथे आहे. ७ जुलै २००३ ला शेती दस्त क्र. २७३९ द्वारे सुशिला चंद्रकांत वाघमारे, मोहम्मद इस्माईल खान, चंद्रकांत विठ्ठलराव वाघमारे, पंकज चंद्रकांत वाघमारे, प्रीती चंद्रकांत वाघमारे, मुन्नवर सलताना मोहम्मद इस्माईल खान, ईरशाद खान, शादाब खान या आठ जणांच्या नावाने शेती खरेदी केली होती. त्यानंतर पुढचे व्यवहार करण्यासाठी या आठही जणांनी सहमतीने या शेतीसंबंधीच्या व्यवहाराचे आममुख्त्यार म्हणून सुशीला वाघमारे आणि मोहम्मद इस्माईल खान या दोघांना नेमले होते. काही दिवसानंतर चंद्रकांत विठ्ठलराव वाघमारे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मालकी हक्काच्या ठिकाणी त्यांचे वारसान म्हणून सुशीला वाघमारे, प्रीती, पंकज आणि देवेश चंद्रकांत वाघमारे यांची नावे यायला हवी होती. मात्र, मोहम्मद इस्माईल खान आणि शादाब खान यांनी तसे केले नाही. उलट खान यांनी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या सुशीला वाघमारे यांचा अंगठा कागदपत्रांवर घेऊन त्या आधारे ९ जानेवारी २०१८ ला रिलिज डीड स्वत:च्या नावाने करून घेतली आणि या जमिनीवर मालकी हक्क असलेल्या वाघमारे कुटुंबातील सदस्यांची फसगत केली. घोषणापत्रात खोटी माहिती खान यांनी रिलीज डीड तयार करताना केलेल्या घोषणापत्रातही खोटी माहिती दिल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. ज्यांच्या नावे या जमिनीची खरेदी केली होती, त्यातील एकाही सदस्याचा मृत्यू झाला नसल्याचे खान यांनी घोषणापत्रात म्हटले आहे. प्रत्यक्षात चंद्रकांत वाघमारे यांचा २००८ मध्येच मृत्यू झाला. तरीसुद्धा खान यांनी ते लपवून खोटी माहिती दिली. बेलतरोडी पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार नोंदवणाऱ्या वाघमारे यांनी संबंधित कागदपत्रेही पोलिसांना पुराव्याखातर दिली आहे.फसवणूक करून एका कुटुंबाला त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीपासून वंचित करण्याचा डाव रचणाऱ्यां खान यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही या तक्रारीतून करण्यात आली आहे. यासंबंधाने कागदपत्राची तपासणी आम्ही करीत आहोत असे बेलतरोडीचे ठाणेदार तलवारे यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा