दुचाकीच्या डिक्कीची झडती अन् झाली एमडी पावडरची जप्ती; ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
By योगेश पांडे | Updated: September 22, 2023 14:05 IST2023-09-22T14:05:29+5:302023-09-22T14:05:49+5:30
सक्करदरा पोलीस ठाणे पथकाची कारवाई

दुचाकीच्या डिक्कीची झडती अन् झाली एमडी पावडरची जप्ती; ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने संशयावरून एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या मोपेडच्या डिक्कीची झडती घेतली असता त्यातून एमडी पावडर आढळून आली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
गुरुवारी दुचाकीवरून एमडी नेण्यात येणार असल्याची माहिती सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर पथकाने दिघोरी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका किराणा दुकानासमोर सापळा रचला व संशयावरून निखील दिलीप गायकवाड (३३, सेनापती नगर, दिघोरी) याला थांबवले. एमएच ४९ बीसी २५१५ या त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता त्यातून २ ग्रॅम २२० मिलीग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी निखीलला अटक केली. त्याच्या ताब्यातून ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.