भरधाव ट्रकची कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:47+5:302020-12-14T04:26:47+5:30
रामटेक : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान ...
![The truck hit the car | भरधाव ट्रकची कारला धडक The truck hit the car | भरधाव ट्रकची कारला धडक](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/nagpur-marathi-default-image-0_202012528112.jpg)
भरधाव ट्रकची कारला धडक
रामटेक : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपूर फाटा परिसरात नुकतीच घडली.
राधा किशन विहार, रा. खात राेड, भंडारा असे मृत महिलेचे नाव असून, रवी शंकरराव देशमुख (५५, रा. भंडारा) व जितेश हिरालाल कनाेजे (३६, रा. भाेंडकी, ता. रामटेक) अशी जखमींची नावे आहेत. ते तिघेही एमएच-३६/एच-२२८६ क्रमांकाच्या कारने रामटेकहून शिवनी (भाेंडकी)ला जात हाेते. ते शिरपूर फाटा परिसरात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमपी-०९/जीजी-१७२२ क्रमांकाच्या ट्रकने त्या कारला जाेरात धडक दिली. त्यात तिघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे राधा विहार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक काेळेकर करीत आहेत.