शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक दुभाजकावर आदळला

By admin | Updated: July 7, 2014 01:07 IST

कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व भरधाव ट्रक दुभाजकावर आदळला. यात आठ जनावरे मृत आढळली. ही घटना नागपूर- सावनेर मार्गावर दहेगाव (रंगारी) शिवारात

दहेगाव शिवारातील घटना : आठ जनावरांचा मृत्यूखापरखेडा : कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व भरधाव ट्रक दुभाजकावर आदळला. यात आठ जनावरे मृत आढळली. ही घटना नागपूर- सावनेर मार्गावर दहेगाव (रंगारी) शिवारात रविवारी सकाळी घडली.एमपी-०९/एचएफ-९१३८ क्रमांकाचा भरधाव ट्रक मध्य प्रदेशातून जनावरे घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, दहेगाव (रंगारी) शिवारात चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. हा ट्रक अंदाजे १०० मीटरपर्यंत फरफटत गेला. अपघात होताच ट्रकचालक व ट्रकमधील इतर व्यक्ती पळून गेल्या. माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी या ट्रकची पाहणी केली असता त्यात आठ जनावरे मृत आढळली. शिवाय, ट्रकमधील सहा जनावरे पळून गेली तर, ११ जनावरे दहेगाव येथील अंगद कोठे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली. या जनावरांवर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. या जनावरांना कोंडवाडा अथवा गो-शाला येथे पाठविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, कुणीही सहकार्य केले नाही, असे खापरखेडा पोलिसांनी सांगितले. हा ट्रक सदर जनावरे घेऊन नागपूर अथवा कामठी येथे जात असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाचपोर, लक्ष्मीप्रसाद दुबे, अमित उमाठे, सूरज परमार, गणेश सोनस्कर करीत आहे. (प्रतिनिधी)