नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तरुणांना ट्रकने चिरडले; एक ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 11:40 AM2021-10-11T11:40:35+5:302021-10-11T12:42:12+5:30

अमरावती येथील अंबादेवीचे दर्शन करून परतणाऱ्या तरुणांच्या रस्त्यात बंद पडलेल्या कारला मागून येत असलेल्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला, दोनजण गंभीर जखमी झाले. तर, एकाला किरकोळ मार लागला.

The truck crushed three young men who were hit by a faulty car | नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तरुणांना ट्रकने चिरडले; एक ठार, तीन जखमी

नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या तरुणांना ट्रकने चिरडले; एक ठार, तीन जखमी

Next
ठळक मुद्देसातनवरी शिवारातील घटना : ट्रकचालक फरार, पोलिसांचा तपास सुरू

नागपूर : अमरावती येथुन आंबादेवीच्या दर्शन करून नागपूरला परत येणाऱ्या तरुणांची कार सातनवरी शिवारात नादुरुस्त झाली. यावेळी कारला धक्का मारत असतांना मागून येत असलेल्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, दोनजण गंभीर जखमी झाले तर, एक किरकोळ जखमी झाला आहे.

कोंढाळी नागपूर येथील चार तरुण नागपूर येथुन अमरावती येथे अंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. अमरावती येथून नागपूरला परत येत असतांना त्यांची स्विफ्ट डिझायर कार सातनवरी शिवारात नादुरुस्त झाली. या नादुरुस्त कारला तरुण धक्का मारत असतांना अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले तर एकाला किरकोळ मार लागला.

आकाश मुरलीधर अडसुले (वय ३१ रा.खरबी रोड वाठोडा, नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. नागपूर येथुन १० अक्टोबरला आकाश मुरलीधर अडसुले, सुमीत रमेश नागदेवे (वय ३१ रा.दिगोरी नागपूर), अश्विन जगन्नाथ वाकोळीकर (वय ३२, तांडापेठ पांचपावली नागपूर), आकाश जगन्नाथ वाकोळीकर (वय ३०, तांडापेठ पांचपावली, नागपूर) हे चौघे तरुण अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. कार आकाश चालवीत होता.

अंबादेवीच्या दर्शनानंतर सायंकाळी सर्व परत नागपूरकडे निघाले. कोंढाळीच्या पूर्वी एका ढाब्यावर जेवण करुन पुन्हा नागपूरकडे जात असतांना कोंढाळी-नागपूर मार्गावर कारचे टायर पंचर झाले, म्हणून टायर बदलले. पण टायर बदलल्यानंतर अनेक वेळा प्रयत्न करुनही कार सुरुच झाली नाही. त्यामुळे, सर्वांनी मदतीसाठी महामार्गाने येणाऱ्या वाहन चालकांना थांबविण्यांचा प्रयत्न सुरू केला. बऱ्याच वेळानंतर दोन कार थांबल्या. त्यातील एका कार चालकानी स्विफ्टच्या स्टेरिंगवर बसून कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. तर, आकाश, सुमीत, अश्विन, आकाश हे चौघेही कारला मागुन धक्का मारत होते.

दरम्यान, सातनवरी शिवारातील जुनघरे पोल्ट्री फार्मनजीक आज पहाटे ३ च्या सुमारास मागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने या तरुणांना व कारला जबर धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फारार झाला व कारच्या स्टेरिंग वर बसलेला अज्ञात व्यक्तीही निघून गेला. ट्रकच्या धडकेत आकाशचा जागीच मृत्यु झाला. तर, सुमीत नागदेवे व अश्वीन वाकोळीकर हे दोघे गंभीर जखमी झाले, आकाश वाकोळीकर हा किरकोळ जखमी झाला.

मृतक व जखमी रोडवर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलीसांना घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य सुरू केले. मृतक व जखमींना नागपूरला रवाना करण्यात आले. तर,अपघातात किरकोळ जखमी आकाश वाकोळीकर याच्या तक्रारीवरुन कोंढाळी पोलीसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला. कोंढाळी पोलीस ट्रकसह फरार चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: The truck crushed three young men who were hit by a faulty car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app