रेवराल : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त माैदा शहरात माैदा तालुका काॅंग्रेस कमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर माैदा शहरातील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना फळ, पाेलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी काॅंग्रेस प्रदेश कमिटीचे महासचिव सुरेश भोयर, जिल्हा परिषदेचे सभापती तापेश्वर वैद्य, सेवा दलाचे अध्यक्ष तुळशीराम काळमेघ, तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती युवराज ठाकरे, नगरपंचायतमधील गटनेता किशोर सॅडल, कामठीचे नगरसेवक काशीनाथ प्रधान, शुभम तिघरे, राजकुमार ठवकर, राजेश निनावे, राजेंद्र लांडे, राजेश ठवकर, विक्की साठवणे, लक्ष्मण गाढवे, दिगंबर ठोंबरे, महेंद्र मोटघरे, दिनकर घाटोळे, विष्णू साठवणे, सतीश रायकोहळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.