शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी मुकणार नामांकित शाळा प्रवेशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:38 IST

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देण्यासाठी आदिवासी विभागाने २०१०-११ पासून योजना राबविली होती. शहरातील नामांकित शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीत प्रवेश दिला जात होता. मुलांच्या राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च आदिवासी विभाग उचलत होते. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे २०२०-२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामामुळे आदिवासी विभागाने नामांकित शाळेत प्रवेश योजना स्थगित केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिली स्थगिती : समाजामध्ये निर्णयाबद्दल संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देण्यासाठी आदिवासी विभागाने २०१०-११ पासून योजना राबविली होती. शहरातील नामांकित शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीत प्रवेश दिला जात होता. मुलांच्या राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च आदिवासी विभाग उचलत होते. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे २०२०-२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामामुळे आदिवासी विभागाने नामांकित शाळेत प्रवेश योजना स्थगित केली आहे.शासनाने २२ मे रोजी काढलेल्या शासननिर्णयात स्पष्ट केले की, चालू वर्षात कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाच्या संसर्गामुळे सर्व शाळा अचानक बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रस्ताव प्राप्त सर्व शाळांची तपासणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वेळेत करता आली नाही. चालू शैक्षणिक वर्षामध्ये नामांकित शाळांची तपासणी व विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया या बाबी मुदतीत होणे शक्य नाही. सोबतच वित्त विभागाने ४ मे रोजी काढलेल्या शासननिर्णयात कोविडमुळे चालू वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी जेवढ्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहे किंवा रद्द करण्यासारख्या आहेत, त्या निश्चित कराव्यात. योजनांवरील एकूण खर्च अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्केच्या मर्यादेत ठेवावा. वित्त विभागाने केलेल्या सूचनांच्या आधारे आदिवासी विभागाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे या योजनेला २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात स्थिगिती दिली आहे. दरम्यान, आदिवासी विभागाच्या या निर्णयामुळे समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.नामांकित शाळेला स्थगिती न देता आदिवासी विकास विभागाने तालुका व जिल्हा स्तरावर आदिवासी पब्लिक स्कूल निर्माण करून नंतर नामांकित शाळेला स्थगिती द्यावी. सद्य परिस्थितीत प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास आदिवासी कुटुंबाला त्यांच्या आवडीनुसार नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याची मुभा द्यावी व शालेय शिक्षण शुल्काची आदिवासी विकास विभागाने प्रतिपूर्ती करावी.दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाStudentविद्यार्थी