आदिवासी विकास परिषदेचा मेळावा
By Admin | Updated: February 18, 2015 02:44 IST2015-02-18T02:44:33+5:302015-02-18T02:44:33+5:30
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त ...

आदिवासी विकास परिषदेचा मेळावा
नागपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी सीताबर्डी येथील सांस्कृतिक बचत भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी परिषदेचे अखिल भारतीय विदर्भ अध्यक्ष अॅड. मनिराम मडावी, उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर देशमुख तर प्रमुख पाहुणे नगरसेवक अरुण डवरे व आर.यु. केराम उपस्थित होते.
आदिवासींच्या कल्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम. आदिवासीसाठी असलेल्या सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली.
आदिवासींना योजनांचा लाभ मिळावा, त्यांना सांस्कृतिक व सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी कार्यकारिणी मंडळाकडून प्रयत्न केले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक पेंदाम यांनी दिली.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. विजेत्या बाल कलाकारांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. जुगनु मसराम, सचिव रमेश आतराम, गुणवंत अतराम, धर्मराज आहके, विजय मडावी, कचरू आतराम, हेमंत पुरके, जयंत भलावी, राहुल सिडाम, रवी परतेकी, महिला मंडळाच्या अध्यक्ष रुपा मसराम, उपाध्यक्ष पुष्पा गेडाम, सचिव सुनीता उईके, शकून मसराम, सरोज नेताम, सीमा सिडाम, वर्षा कौरती आदी उपस्थित होते. प्रारंभी राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्याला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)